पोलिस शिपाई सचिन हांडे सेवेतून बडतर्फ

file photo
file photo

नागपूर : पोलिस वर्दीतच दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणारा वाहतूक शाखेचा पोलिस शिपाई सचिन विनायक हांडे यास शहर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. सहपोलिस आयुक्‍त रवींद्र कदम यांनी आज बडतर्फीचे आदेश काढले.
9 जून रोजी सकाळी पाचच्या सुमारास सचिन हांडे आणि प्रणय हेमंत म्हैसकर (23) मानकापूर हे दोघे (एमएच 31 ईयू 4873) क्रमांकाच्या मारुती कारमधून दारूची तस्करी करीत होते. दारूच्या पेट्या भरून असलेली कार नंदोरी टोलनाक्‍याकडे जात होती. हा प्रकार रात्र गस्तीवर असलेले वरोरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार उमेश पाटील यांच्या नजरेस आला. ठाणेदार पाटील यांनी कारचालकाला थांबण्याचा इशारा केला असता चालक प्रणयने वेगात कार पळविली. ठाणेदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारचा पाठलाग करून कोंडा फाटा येथे कारला पकडले. वरोरा पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात ऑफिसर्स चॉईस आणि इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या 180 मिलीच्या दारूच्या पेट्या मिळून आल्या. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली होती. त्याचप्रमाणे दारूच्या पेट्यासह, दोन मोबाईल, कार असा 9 लाख 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. वरोरा पोलिसांनी दोघांनाही चंद्रपूरच्या न्यायालयात हजर करून त्यांची 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी घेतली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com