Akatmata duad
Akatmata duad

गडचिरोलीत राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले जवान 

गडचिरोली  : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, पोलिस दल व केंद्रीय राखीव दल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात गुरुवारी (ता.31) राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यात पोलिस जवानांसह शेकडो युवक व युवतींनी सहभाग घेतला. 
स्थानिक इंदिरा गांधी चौकात सकाळी सात वाजता अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय बंसल, केंद्रीय राखीव दलाच्या 192 तुकडीचे कमांडर सिंग यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून राष्ट्रीय एकता दौडला सुरवात करण्यात आली. राष्ट्रीय दौडमध्ये केंद्रीय राखीव दलाचे जवान, पोलिस दलाचे जवान, युवक-युवती, विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी अन्य नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित प्रशासकीय कर्मचारी, पोलिस दलाचे जवान, केंद्रीय राखीव दलाचे जवान, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय बंसल यांनी एकात्मतेची शपथ दिली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डी.एस.कुळमेथे, निवासी उपजिल्हाधिकारी ए.एल. वालस्कर, नायब तहसीलदार एस.के. चडगुलवार, विधी अधिकारी हरीश बांबोळे उपस्थित होते. 
अजय बंसल म्हणाले की, सध्याची परिस्थिती बघता राष्ट्रीय एकात्मता टिकवणे काळाची 
गरज असून यात युवकांची महत्त्वाची भूमिका आहे. ते देशाचे आधारस्तंभ असून सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचा समाजाला फायदा होतो, असे ते म्हणाले. 

पोलिस दलाचे योगदान 
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने तरुणांना यापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस दल सातत्याने प्रयत्न करीत आहे. जनतेशी समन्वय ठेवण्यासाठी गावपातळीवर जनजागरण मेळावे, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा, रोजगार मेळावे, मतदार जागृती अभियान, स्वच्छ भारत अभियान याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामुळे या उपक्रमांचा पोलिस दलाला मोठा फायदा झाला असून नक्षलवाद निर्मूलनासाठी मदत होत आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com