प्रेरणादायी! पोलिस उपनिरीक्षकांनी दिले पूरपीडितांना छत्र

File photo
File photo

गडचिरोली : सततच्या पावसामुळे भामरागड तालुक्‍यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कित्येकांची घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत. याची दखल घेत महाराष्ट्र पोलिस दलातील 103 क्रमांकाच्या पोलिस उपनिरीक्षक बॅचकडून 740 ताडपत्री पाठविण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना अधिकाऱ्यांनी मदतीचे साहित्य सुपूर्द केले. त्यामुळे उघड्यावर निवारा करणाऱ्या शेकडो पूरपीडितांना छत्र मिळाले आहे.
भामरागड तालुक्‍यात यंदा पुरामुळे मोठी हानी झाली. दहा ते 15 गावांना मोठा फटका बसला असून विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. महसूल प्रशासन, जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मदतीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात सरसावले असले तरी पाऊस सुरूच असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून रस्ते नसल्याने मदतीसाठी चिखल तुडवत गावापर्यंत पोहोचावे लागत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचा ओघ सुरू असून घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना आपले घर दुरुस्त किंवा नव्याने तयार करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. ही समस्या ओळखून महाराष्ट्र पोलिस दलातील 103 क्रमांकाच्या पोलिस उपनिरीक्षक बॅचकडून 740 ताडपत्री पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आल्या. एका ताडपत्रीची किमत एक लाख रुपये असून चांगल्या दर्जाच्या या ताडपत्रीने पूरपिडितांच्या निवाऱ्याचा तात्पुरता प्रश्‍न सुटणार आहे.

प्रशासनाकडून मिळणार घरकुल
भामरागड तालुक्‍यात पर्लकोटाच्या पुरामुळे शेकडो नागरिकांची घरे पूर्णत: उद्‌ध्वस्त झाली. सध्या कित्येक लोक नातेवाईक, सरकारी इमारत किंवा तात्पुरत्या स्वरूपात तंबू लावून आपली गुजराण करीत आहेत. यातील अनेकांनी शासनाच्या घरकुलांचा लाभ घेऊन घरे बांधली होती. मात्र, पुरामुळे घरांचे नुकसान झाले, अशा लोकांनाही प्रशासनाकडून नव्याने घरकुल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com