पोलिस भरतीवर करडी नजर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

भंडारा - येथील पोलिस मुख्यालयातील पोलिस मैदानावर बुधवारपासून पोलिस भरती सुरू झाली. त्याकरिता उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत असून, भरती प्रक्रियेवर करडी नजर ठेवण्यासाठी एकूण 24 कॅमेरांद्वारे चित्रीकरण करण्यात येत आहे. 

पोलिस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात पोलिस शिपाई पदाकरिता भरती प्रक्रिया राबविली जात असून, 22 पासून उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. उमेदवारांची लांब उडी, उंच उडी, 100 मीटर धावणे, पुल्सअप ही चाचणी घेण्यात येत आहे. बारावी उत्तीर्ण या शैक्षणिक पात्रतेवर आधारित भरती प्रक्रिया राबविली जात आहे. 

पोलिस भरतीदरम्यान होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी विभागाद्वारे 24 व्हिडिओ कॅमेराद्वारे रेकॉर्डिंग केली जात आहे. या प्रक्रियेसाठी पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, चार पोलिस उपविभागीय अधिकारी, 12 पोलिस निरीक्षक, 25 सहायक पोलिस निरीक्षक, 14 पोलिस उपनिरीक्षक आणि 349 पोलिस कर्मचारी यांच्यासह लिपीक संवर्गातील कर्मचारी सहभागी झालेले आहेत. 

Web Title: Police recruitment