मुश्‍ताकवर पाच लाख तर अन्य आरोपींवर एक लाखाचे बक्षीस

श्रीधर ढगे
बुधवार, 4 जुलै 2018

पॅरोलवर सुटताच सक्रीय
मुश्‍ताक याने केलेल्या गोळीबारात हरीयाणातील एका पोलिसाचा मृत्यू झाल्याने त्यास १० वर्षे कैद झाली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच तो पॅरोलवर सुटला. त्यानंतर पुन्हा गुन्हेगारीत सक्रीस झालेला आहे. १९ जून रोजी हरियाणा पोलिसांशी झालेल्या चकमकीत गोळीबारात मुश्‍ताक जखमी झालेला आहे. तरी तो एटीएम फोडण्यासाठी नागपूर व नांदेडला टोळीसह आला होता. त्याने हैदराबादमध्ये व अन्य ठिकाणी उपचार घेतला.

खामगाव : नागपूर व नांदेड येथील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या मुश्‍ताकची माहिती देणाऱ्यास हरियाणा पोलिसांनी पाच लाखांचे तर अन्य आरोपींवर एक लाखांचे बक्षीस ठेवलेले आहे, या टोळीने हरीयाणा, राजस्थान व मध्यप्रदेशात ५० पेक्षा जास्त गुन्ह्यांना अंजाम दिलेला असून आता त्यांनी महाराष्ट्रात आपले बस्तान बसविणे सुरू केले होते. अशी माहिती तपासात समोर आली आहे.

नागपूर व नांदेड येथील एटीएम फोडून फरार झालेल्या टोळीस खामगाव पोलिसांनी पाठलाग करून चिखली बुद्रूक गावकऱ्यांच्या मदतीने २७ जून रोजी पकडले. त्यांच्याकडून ५२ लाख ७२ हजार रोख, एक देशी कट्टा, स्कॉपिओ गाडी व इतर साहित्य जप्त केले. खामगाव पोलिसांनी चार जणांना पकडले मात्र मुश्‍ताक व त्याची पत्नी फरार होण्यात यशस्वी झाले असून त्याच्याकडे जवळपास २० लाखांची रोकड असल्याची माहीती आहे. सध्या  अर्षद खान रहेमान खान, आसिफ खान हारून खान, अब्दुला मजीद व इरफान खान हे चार आरोपी ७ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान चौकशीत त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तर हरियाणा पोलिसांनी या टोळीचा म्होरक्‍या मुश्‍ताक वर पाच लाखांचे व तर अन्य आरोपिंवर एक लाखाचे बक्षीस ठेवले असल्याची माहीतीसुद्धा समोर आली आहे.

पॅरोलवर सुटताच सक्रीय
मुश्‍ताक याने केलेल्या गोळीबारात हरीयाणातील एका पोलिसाचा मृत्यू झाल्याने त्यास १० वर्षे कैद झाली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच तो पॅरोलवर सुटला. त्यानंतर पुन्हा गुन्हेगारीत सक्रीस झालेला आहे. १९ जून रोजी हरियाणा पोलिसांशी झालेल्या चकमकीत गोळीबारात मुश्‍ताक जखमी झालेला आहे. तरी तो एटीएम फोडण्यासाठी नागपूर व नांदेडला टोळीसह आला होता. त्याने हैदराबादमध्ये व अन्य ठिकाणी उपचार घेतला.

एटीएम फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या मुश्‍ताक व त्याची पत्नी फरार आहे. या टोळीवर राजस्थान, हरियाणा व मध्यप्रदेश मध्ये ५० पेक्षा जास्त गुन्हे आहेत. या प्रकरणात तपासकरीता खामगाव पोलिसांच्या टिम नागपूर व नांदेडसह अन्य ठिकाणी रवाना करण्यात आल्या आहेत. टोळीकडून अनेक मोठे गुन्हे उघडकीस येणार आहेत.
- प्रदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव

Web Title: police reward for criminal in Nanded