पोलिसांनी वाचविले विहिरीत पडलेल्या व्यक्‍तीचे प्राण

पोलिसांनी वाचविले विहिरीत पडलेल्या व्यक्‍तीचे प्राण

बुटीबोरी - पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत तोल जाऊन पडलेल्या व्यक्‍तीचा पोलिसांच्या समयसूचकतेमुळे जीव वाचविण्यात यश आले. गजू मारोतराव नेवारे (वय ४०, वॉर्ड क्र.३, बुटीबोरी) असे विहिरीत पडलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. 

तो बुधवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास बुटीबोरी येथील अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्याच्या परिसरातील होलीक्रॉस शाळेच्या समोरून जात असताना लक्ष नसल्याने त्याचा अचानक तोल जाऊन कठडे नसलेल्या सार्वजनिक विहिरीत पडला. नागरिकांचे लक्ष गेल्याने त्यांनी लगेच पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेळेची कसर न ठेवता पोलिस उपनिरीक्षक मनोज मेश्राम, हवालदार सुरेश धवराळ, मिलिंद नांदुरकर, गजेंद्र चौधरी आणि अमृत किनगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल ३० मिनिटे तारेवरची कसरत केल्यानंतर उपस्थित नागरिकांची मदत घेवून त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. 

त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला नातेवाइकाच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख आणि नागरिकांनी कर्तव्य प्रामाणिकपणे निभावणायया पोलिसांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com