गुन्हेगारी वर्चस्वासाठी शस्त्र बाळगण्याचा ट्रेंड

भगवान वानखेडे
शनिवार, 20 एप्रिल 2019

चार दिवसात दुसरी कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता.१३) विदेशी बनावटीचे देशी धाटणीची पिस्टल आणि धारदार चाकू जप्त केला होता. यामध्ये भगीरथ वाडी येथील विजय भरत भटकर (वय ३०) आणि दुर्गा चौकामधील रहिवासी कोमल सुभाष कुत्तरमारे (वय २५) याच्याकडून चाकू जप्त करून या दोन सराईत गुन्हेगाराना अटक केली होती. तर १७ एप्रिल रोजी डाबकी रोड परिसरातील रेणुका नगर यथील अभिजीत माधव राऊत (वय २२) याच्याकडे विदेशी धाटणीची देशी पिस्टल (किंमत २५ हजार )जप्त करून कारवाई केली होती. या दोन्ही कारवाया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे, शेख हसन, अशोक चाटी, एजाज अहमद, अब्दुल माजीद, अभय बावस्कार, अश्वीन मिश्रा, रवि इरचे या पथकाने केल्या होत्या.  

अकोला :  संवेदनशीलता कमी होऊन गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यासोबतच गुन्हेगारीमध्ये वर्चस्व राहले पाहीजे, लोकांनी मला भीले पाहीजे या आणि अशा अनेक कारणांनी शहरात देशी कट्ट्यासह धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे जरी असले तरी स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष पथकानी कारवाया करून ही शस्त्र जप्त केले आहेत. मात्र, या कारवायावरून शहरात गुन्हेगारीची मानसिकता बळावून शस्त्र बाळगण्याचा ट्रेंड तर तयार होत नाही ना? असा प्रश्न या निमीत्ताने समोर येत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरून स्थानिक गुन्हे शाखेने १३ आणि १७ एप्रिल रोजी धडाकेबाज कारवाया करीत पिस्टल आणि धारदार शस्त्रे जप्त केली. या कारवायामुळे शस्त्र बाळगणाऱ्यांंमध्ये धडकी जरी भरली असली तरी ही शस्त्रे येतात तरी कोठून? हा प्रश्न या निमित्ताने अकोलेकरांना पडला आहे. विशेष म्हणजे शहरातील अशिक्षीत आणि झोपडपट्टी परिसरातील युवकांकडेच ही शस्त्रे  आढळत आहेत हे विशेष. धक्क्याला बुक्की लागल्यानंतर तत्काळ पिस्टल काढून धमकी देणारे युवक गुन्हेगारीत दबदबा कायम रहावा म्हणून शस्त्र बाळगत असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. 

चार दिवसात दुसरी कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता.१३) विदेशी बनावटीचे देशी धाटणीची पिस्टल आणि धारदार चाकू जप्त केला होता. यामध्ये भगीरथ वाडी येथील विजय भरत भटकर (वय ३०) आणि दुर्गा चौकामधील रहिवासी कोमल सुभाष कुत्तरमारे (वय २५) याच्याकडून चाकू जप्त करून या दोन सराईत गुन्हेगाराना अटक केली होती. तर १७ एप्रिल रोजी डाबकी रोड परिसरातील रेणुका नगर यथील अभिजीत माधव राऊत (वय २२) याच्याकडे विदेशी धाटणीची देशी पिस्टल (किंमत २५ हजार )जप्त करून कारवाई केली होती. या दोन्ही कारवाया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे, शेख हसन, अशोक चाटी, एजाज अहमद, अब्दुल माजीद, अभय बावस्कार, अश्वीन मिश्रा, रवि इरचे या पथकाने केल्या होत्या.  

येथून येतात शहरात शस्त्र
शहरात पिस्टल आणि धारदार शस्त्रे ही मध्यप्रदेश, अजमेर, इंदौर, येथून तर बुलडाणा जिल्ह्यातील टुनकी बावनबीर येथून शस्त्र अकोला शहरात येत असल्याची गुप्त माहिती आहे. विशेष म्हणजे टुनकी बावनबीर येथे २५ हजारापासून एक लाखापर्यंत शस्त्र बनवून दिली जातात. केवळ खंडणी मागणीसाठी आणि गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व कायम राहावे म्हणून शस्त्र खरेदी केली जात असल्याची माहिती आहे.

Web Title: police seized pistols in Akola