वर्ध्यात लागला आयपीएलवर सट्टा; पोलिसांनी कारवाई करत एकाला केली अटक  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

वध्र्यातील पावडे नर्सिंग होम  परिसरात सलीम शहजात पठाण रा. आनंदनगर हा आयपीएलच्या सा‘न्यावर जुगार भरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून या इमारतीवर छापा टाकला.

वर्धा  : सध्या आयपीएलचा पहिला टप्पा संपला आहे. दुसèया टप्प्याची रंगत सुरू असताना वध्र्यात रविवारी (ता. १८) खेळल्या गेलेल्या कोलकता नाईट रायडर विरूद्ध सनरायजर हैदराबाद यांच्या सुरू असलेल्या क्रिकेट सा‘न्यावर जुगार भरविणाèया एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई सायंकाळी करण्यात आली. 

वध्र्यातील पावडे नर्सिंग होम  परिसरात सलीम शहजात पठाण रा. आनंदनगर हा आयपीएलच्या सा‘न्यावर जुगार भरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून या इमारतीवर छापा टाकला. आयपीएलवर फोनच्या माध्यमातून बेटिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावरून पोलिसांनी सलीम याला ताब्यात घेतले. 

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

त्याच्याजवळून सात हजार रुपये रोख, एक टीव्ही, चार मोबाईलसह लिहिलेली एक चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे. 
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संजय मिश्रा, संतोष कुकडकर, धर्मेंद्र अकाली, अनिल चव्हाण, नीलेश करडे, अमर लाखे, आनंद भस्मे यांनी केली. 

वध्र्यात क्रिकेट सट्ट्याचा जुना इतिहास 

क्रिकेटच्या सट्ट्यात वध्र्याचा मोठा इतिहास आहे. येथे क्रिकेट सट्ट्यावर अनेकवार छापे मारण्यात आले आहे. आयपीएलवरील सट्टा वध्र्यात सुरू असल्याचे आजच्या कारवाईने पुन्हा उघड झाले आहे. पोलिसांनी याकडे लक्ष दिल्यास आणखी मोठे बुकी हाती येण्याची शक्यता आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police took action against satta players