भाजपच्या कार्यकर्त्यांना नाही कोरोनाची भीती, सत्कार कार्यक्रमाची माहिती मिळताच पोलिसांनी उचलले हे पाऊल...

Police turned water on BJP's reception at Wardha
Police turned water on BJP's reception at Wardha

वर्धा : भाजपच्या राज्य कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. या कार्यकारिणीत राजेश बकाने यांची महासचिवपदी नियुक्ती झाल्याने भाजपच्या जिल्हा कार्यालयात रविवारी (ता. पाच) त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. कोरोना संसर्गाचा काळात सत्कार कार्यक्रमावर बंदी असताना तो होत असल्याचे कळताच पोलिसांनी हा कार्यक्रम थांबवीत सत्कारावर पाणी फेरले. 

सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना असताना भाजपच्या जिल्हा कार्यालयात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाला तीनशे ते चारशे कार्यकर्ते गोळा झाले होते. सत्कार कार्यक्रमाची कुठलीही परवानगी आयोजकांकडून घेण्यात आली नव्हती. याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली. यावरून रामनगर पोलिस ठाण्याच्या खुपिया पोलिसांनी सत्कार कार्यक्रम पोहोचत तो थांबविला. परवानगीची माहिती विचारी असता त्यांच्याकडे काहीच उपलब्ध नसल्याचे पुढे आले.

भाजपच्या कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमाबाबत पक्षाच्या पदाधिऱ्यांत एकी नसल्याचे दिसून आले. कार्यक्रमाला खुद्द जिल्हाध्यक्ष आणि इतर मोठे नेतेही गैरहजर होते. सध्या असलेल्या परिस्थितीत असा कार्यक्रम घेण्यास त्यांचा विरोध असल्याचे कळते. असे असताना कुण्या एका पदाधिऱ्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. यामुळे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत गटबाजी सुरू असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी दिसली. 

पक्षाची प्रतिमा डागाळल्या गेली 
भाजप कार्यालयात नवनियुक्तांच्या सत्काराच्या आयोजनाची माहिती मिळाली. सध्या असलेल्या परिस्थितीत असा कार्यक्रम घेणे योग्य नसल्याचे म्हणत नकार दिला होता. परंतु, आपले संख्याबळ दाखविण्याच्या नादात काही जबाबदार लोकप्रतिनिधींनी कार्यक्रम घेतला. यावेळी मी उपस्थित नव्हतो. नियमभंगाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली. याप्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मात्र डागाळल्या गेली आहे. 
- शिरीष गोडे, 
जिल्हाध्यक्ष भाजप

आयोजकांवर कारवाई करण्यात येईल 
कुठलीही परवानगी न घेता गर्दी करून जिल्हाधिऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रामनगर ठाण्याच्या खुपिया पोलिसांनी ही कारवाई केली. यात आयोजकांवर कारवाई करण्यात येईल. 
- पीयूष जगताप, 
उपविभागीय अधिकारी, वर्धा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com