खर आहे, काळ कधीही सांगून येत नाही... ते नेहमीप्रमाणे घरून निघाले अन् महामार्गावर पॉइंट ड्यूटीवर तैनात झाले; मात्र

संतोष ताकपिरे
Friday, 4 September 2020

जिजे १९ एक्‍स ३६७० क्रमांकाचा अमरावतीहून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रकने इंगळे यांना चिरडले. शरीराचे दोन तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिस निरीक्षक अहेरकर यांनी सांगितले. अपघातात पोलिसाचा मृत्यू झाल्याचे कळताच चालकाने ट्रक अपघातस्थळी सोडून जंगलात पळ काढला.

अमरावती : अमरावती ते अकोला महामार्गावर पॉइंट ड्यूटीवर तैनात पोलिस कर्मचाऱ्यास सिमेंट पोत्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले. यात पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. गोपाल किसन इंगळे (वय ४२, ब. नं. १३९४) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. तीन) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून महामार्गावर लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत साई ढाब्याजवळ ग्रामीण पोलिसांचा चौकशीसाठी पॉइंट लागला होता. त्यामुळे रस्त्यावर बॅरिकेटिंग लावून वाहनांची तपासणी टप्प्याटप्याने केली जायची. इंगळे ग्रामीण पोलिस मुख्यालयातील आपल्या साथीदारासह ड्यूटी पॉइंटवर तैनात होते.

वाचा - नागरिकांनो सावधान! हा जीव तुमच्या घरी तर नाही ना? असेल तर आताच काढा बाहेर.. अन्यथा..

दरम्यान, जिजे १९ एक्‍स ३६७० क्रमांकाचा अमरावतीहून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रकने इंगळे यांना चिरडले. शरीराचे दोन तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिस निरीक्षक अहेरकर यांनी सांगितले. अपघातात पोलिसाचा मृत्यू झाल्याचे कळताच चालकाने ट्रक अपघातस्थळी सोडून जंगलात पळ काढला.

लोणी पोलिसांनी धडक देणारा ट्रक जप्त केला. पसार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. वृत्त लिहीस्तोवर चालकास अटक झाली नसल्याचे लोणी पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. इंगळे हे ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत होते, असे एसपींनी स्पष्ट केले.

अवश्य वाचा - हे तर जणू तुकाराम मुंढेच! नागपूरच्या नव्या आयुक्तांचा तब्बल ६६ अधिकाऱ्यांना दणका..

पोलिस वर्तुळात खळबळ

मृत पोलिसाचा मृतदेह अमरावती जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला. मात्र, आपल्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ माजली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police were crushed by a cement truck on the highway