पावसाळ्यात ठरणार नालेसफाईचे धोरण

file photo
file photo

नागपूर : शहरात नालेसफाईची कामे फेब्रुवारीपासून केली जातात. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. आता पावसाळ्यात नालेसफाईचे धोरण तयार करण्यात येणार आहे. यासंबंधात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यानिमित्त महापालिका आतापर्यंत धोरणाशिवायच नालेसफाईची कामे करीत असल्याचेही पुढे आले आहे.
महापालिकांमध्ये नालेसफाईचे धोरणच नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आढळून आले. त्यामुळे नुकताच त्यांनी विधानसभेत सर्व महापालिकांना नालेसफाईचे धोरण ठरविण्याचे निर्देश दिले. जणू मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाचीच प्रतीक्षा करीत असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची सोमवारी महापौर नंदा जिचकार यांनी बैठक घेतली. अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसात शहरातील विविध वस्त्यांमध्ये आणि सखल भागात पाणी साचण्याचे अनेक कारणे आहेत. नालेसफाई, नाल्यांमध्ये कचरा, हॉटेल्सचे शिळे अन्न, घरातील खरकटं यासह अन्य कचरा साचू नये यासाठी यंत्रणेने नालेसफाईचे धोरण ठरवावे यासंदर्भातील अहवाल तातडीने सादर करा, असे निर्देश महापौरांनी दिले. मनपाच्या उपद्रव प्रतिबंधक पथकाद्वारे सर्वत्र दंडात्मक कारवाई सुरू आहे. पथकाने लोकांमध्ये जनजागृतीही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.
बैठकीत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, दुर्बल घटक समिती सभापती हरीश दिकोंडवार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, विविध समिती तसेच झोन सभापतींसह प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त सर्वश्री सुभाष जयदेव, प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरीश राऊत, गणेश राठोड, राजू भिवगडे, सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
नाल्यांची नियमित सफाई तसेच त्यात कचरा टाकण्यावर प्रतिबंध लावण्यासाठी उघडणारे व बंद होणारे लोखंडी आवरण लावण्याची सूचना दयाशंकर तिवारी यांनी केली. पाण्याच्या लाइन, सिवर लाइन, ट्रंक लाइनची सहजतेने माहिती व्हावी यासाठी झोनल अधिकारी, अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांच्याशी समन्वय साधून नगरसेवकांनी प्लेन टेबल सर्वे करावा, अशी संकल्पनाही त्यांनी मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com