Live Updates भंडारा जिल्हा नवजात शिशू दुर्घटना : राजकीय नेत्यानी केली कोणकोणती मागणी, वाचा... 

Political leaders express grief over Bhandara fire case
Political leaders express grief over Bhandara fire case

भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून, सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

Live Upadate - 

गृहमंत्री अनिल देशमुख - 
- भंडारा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल
- भंडारामध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.
- दोषी आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
- मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
- फायर ऑडिट झाले की नाही हे चौकशीत माहीत पडेल

देवेंद्र फडणवीस - 
- आम्ही सखोल चौकशीची मागणी करतो.
- जबाबदार असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा.
- महाराष्ट्रात अशी आणखी काही रुग्णालये असतील तर त्यांनी अग्निसुरक्षा ऑडिट केले पाहिजे.
- सरकारने मृताच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत दिली पाहिजे

विजय वडेट्टीवार - 
- पंधरा दिवसांत घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. फायर सिस्टम बसविल्याशिवाय इमारतीचे उद्घटनाच करणार नाही, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

संजय राठोड - 
- वनमंत्री संजय राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयात पाहणी केली.

छगन भुजवबळ - 
- घटनेची चौकशी करून दोषीेवर कारवाई करणार -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर यूनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ज्यात दहा मुलांचा मृत्यू झाला. ‘मी शब्दांच्या पलीकडे दु:खी आहे. माझे विचार व शोक शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत’ असे ट्विट गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारात ही आग लागली. यात सतरा बालकांपैकी सात बालकांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त येत आहे.

तांत्रिक समिती चौकशी करेल
पहाटे दोन वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत दहा मुलांचा मृत्यू झाला. सात मुलांचे प्राण वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आगी मागील कारण शोधण्यासाठी तांत्रिक समिती चौकशी करेल.
- संदीप कदम,
जिल्हाधिकारी, भंडारा

भंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना मदत करावी, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून, त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत बालकाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com