वेगळा विदर्भ नाही, तर पुन्हा सत्ताही नाही

नागपूर : आत्मक्‍लेश आंदोलनात बोलताना राम नेवले, उपस्थित डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, राजकुमार नागुलवार, विजया धोटे व विदर्भवादी पदाधिकारी.
नागपूर : आत्मक्‍लेश आंदोलनात बोलताना राम नेवले, उपस्थित डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, राजकुमार नागुलवार, विजया धोटे व विदर्भवादी पदाधिकारी.

वेगळा विदर्भ नाही, तर पुन्हा सत्ताही नाही
नागपूर : आगामी निवडणुकीपूर्वीच वेगळा विदर्भ द्यावाच लागेल अन्यथा भाजपला विदर्भातून जावेच लागेल, असा निर्वाणीचा इशारा देत विदर्भवाद्यांनी "विदर्भ राज लेके रहेंगे'चा निर्धार केला.
महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मंगळवारी विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी सामूहिक उपोषण आत्मक्‍लेश आंदोलन करण्यात आले. याच शृंखलेत उपराजधानीतही शहीद चौक, इतवारी येथील विदर्भ चंडिका मंदिरासमोर सकाळी नऊपासून आंदोलनाला प्रारंभ झाला. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखालील आंदोलनप्रसंगी मुख्य संयोजक राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, विजया धोटे, राजकुमार नागूलवार, मुकेश मासुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. खांदेवाले यांनी खोटारड्या सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. प्रबीरकुमार चक्रवर्ती यांनी वेगळ्या विदर्भासाठी युवक व महिलांनी निर्णायक आघाडी घ्यावी, अशी भावना व्यक्त केली. राम नेवले म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत विदर्भाचा प्रश्‍नच प्रमुख मुद्दा राहील. भाजप नेत्यांनी आताच वेगळ्या विदर्भासाठी जोर लावावा. निवडणुकीपूर्वी वेगळा विदर्भ दिला नाही, तर भाजपला पुढील वाटचाल कठीण होईल, असा इशारा त्यांनी दिला. गणेश शर्मा, धर्मराज रेवतकर, श्‍याम वाघ, मुकेश मासुरकर, श्रीदेवी रंगारी यांच्यासह शेकडे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी राकॉंचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर, आमदार प्रकाश गजभिये, दिलीप पनकुले, महादेव फुके, रुद्र धाकडे यावेळी त्यांच्यासोबत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com