Vidhan Sabha 2019 : हवाई दलाच्या शौर्याचा राजकीय वापर- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

हल्ली पुलवामा व उरी या ठिकाणी सैन्याने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. असा वापर करणे भारतीय सैन्यासाठी चुकीचा होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

विधानसभा 2019 
यवतमाळ - ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहासच रचला नाही, तर भूगोल तयार केला. त्यांनी कधीही सैन्याचा वापर राजकारणासाठी केला नाही. हल्ली पुलवामा व उरी या ठिकाणी सैन्याने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. असा वापर करणे भारतीय सैन्यासाठी चुकीचा होईल’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

येथील माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज गुरुवारी (ता.10) आयोजित पत्रकार परिषद श्री. पवार बोलत होते. भारतीय सैन्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे. पुलवामा व बालाकोट हल्ल्यानंतर आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी सरकार व भारतीय सैन्य जी कारवाई करेल, त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मात्र, कालांतराने भारतीय सैन्यांनी केलेल्या शौर्याचा वापर राजकारणासाठी करणे सुरू झाले, हे योग्य नाही, असे म्हणत श्री. पवार यांनी सत्ताधारी केंद्रीय नेतृत्वावर टीका केली. हे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने असे मुद्दे राजकारणात वापर करणे अत्यंत चुकीचे असल्याचेही श्री. पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political use of Air Force bravery