राजकारणातील दिल, दोस्ती, दुनियादारी; जिवलग मित्राला नगराध्यक्षपदाची भेट 

politician gifted his post to his politician friend
politician gifted his post to his politician friend

राजुरा (जि.चंद्रपूर) ः राजकारणात कोणी मित्र नसतो, कोणी शत्रू नसतो असे म्हटले जाते. प्रसंगानुरूप अनेक जण आपला चेहरा बदलतात. मात्र, 35 वर्षांच्या राजकारणातील जिवलग जोडीने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. हे जिवलग मित्र आहेत नगराध्यक्ष अरुण धोटे व उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे. नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी अचानक दोन महिने रजेवर जाण्याचा निर्णय घेत आपले मित्र उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांना दोन महिन्यासाठी नगराध्यक्षपदाची धुरा दिली. पस्तीस वर्षांच्या राजकारणातील नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचे आपल्या मित्राचे स्वप्नही पूर्ण केले. विश्‍वासाचे नाते जपणाऱ्या राजकीय मैत्रीची शहरात चांगली चर्चा रंगली आहे.

नगर परिषदेच्या सभागृहात सर्वाधिक कार्यकाळ अरुण धोटे आणि सुनील देशपांडे यांचा राहिलेला आहे. दोघांनीही 1986 मध्ये राजकीय जीवनाची सुरवात नगर परिषद निवडणुकीतून केली. पहिल्याच निवडणुकीमध्ये राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला. तब्बल 35 वर्षांपासून दोघेही सभागृहाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आतापर्यंत नगराध्यक्ष अरुण धोटे सतत सातदा निवडून आले. शहराचे तीनदा नगराध्यक्ष पद भूषविले. दोनदा थेट नगराध्यक्ष म्हणून लोकांमधून निवडून आले. एकदा बहुमताने नगराध्यक्ष बनले. सुनील देशपांडे यांचाही राजकीय आलेख चढता आहे.

 सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2011 मध्ये पराभूत झाल्यानंतर नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी लगेच स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना सभागृहात घेतले. सत्तेत आल्यानंतर आपला मित्र पराभूत झाल्याची खंत अरुण धोटे यांना होती. मित्रत्वाचे नाते जोपासत स्वीकृत सदस्य करून दिलदारपणा जोपासला. मागील पस्तीस वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आलेत. मात्र अरुण धोटे आणि सुनील देशपांडे यांनी आपल्या मैत्रीत कधीही दुरावा निर्माण होऊ दिला नाही. 

सुनील देशपांडे यांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न होते. मात्र, ते थोडक्‍यात हुकले. आपल्या मित्राची नगराध्यक्षपदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी अचानक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या मित्राकडे नगराध्यक्ष पदाचा पदभार सोपवला.

सरप्राईज गिफ्टमुळे नगरसेवक आणि मित्रमंडळही अवाक झाली. कुठलीही पूर्वकल्पना नगरसेवकांना किंवा नगर प्रशासनाला नव्हती. अरुण धोटे यांनी आपल्या मित्राला सरप्राईज गिफ्ट द्यायचे ठरविले होते. अरुण धोटे यांनी अचानकपणे दोन महिने रजेवर जाण्याचा निर्णय घेत नगराध्यक्षाचा पदभार सुनील देशपांडे यांना दिले. 31 डिसेंबर 2020 पर्यत ते नगराध्यक्ष म्हणून शहराचे काम पाहणार आहेत..

हे सरप्राईज गिफ्ट आहे. गेली पस्तीस वर्षे आम्ही राजकारणात एकत्र आहोत. शहराच्या विकासासाठी अरुण धोटे यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांना पुढे नेण्याचा प्रयत्न राहील.
सुनील देशपांडे ,
प्रभारी नगराध्यक्ष, राजुरा. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com