खामगाव : जिल्हा परिषद अध्यक्षांना पदाचा मोह की राजकीय खेळी?

khamgao
khamgao

खामगाव : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला नसल्याने भाजपात अंतर्गत दुही वाढण्याची स्थिती निर्माण झालेली असून भाजपाच्या जवळपास 17  सदस्यांनी स्वतंत्र्य गट स्थापन केला आहे. मात्र पक्षांतर्गत कलह वाढू नये म्हणून पक्षश्रेष्ठींकडून त्यांची मनधरणी सुरु असून आता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत महत्वाची बैठक 8 ऑक्टोबरला बुलडाणा येथे होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा यांना पदाचा मोह की स्थानिक नेत्यांची राजकीय खेळी आहे, अशी चर्चा सुद्धा रंगत आहे.

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे यांनी सव्वा वर्षानंतर राजीनामा द्यावा असा करार सत्ता स्थापनेच्या वेळी पक्षातंर्गत झाला होता. त्यानुसार मार्च महिन्यातच तायडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. मात्र त्यांनी राजीनामा दिला नसल्याने भाजपातील जिल्हा परिषद सदस्य नाराजी व्यक्त करीत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या आजवर झालेल्या बैठकीतुन काहीच फलीत निघाले नाही. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाची प्रक्रिया काही काळ लांबणीवर पडली होती. मात्र आता मिनी मंत्रालयातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा राजीनामा देत नसल्याने 17 नाराज सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला त्याला आता एका महिला सभापतीचा सुध्दा पाठिंबा मिळाला आहे. सत्ताधारी गटातच अशी फुट पडल्याने भाजपात अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या 17 सदस्यांना सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी सुध्दा प्रयत्न करत असल्याचे कळते. दरम्यान आता जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडी वेगात सुरू आहेत.

नेत्यांचा सबुरीचा सल्ला 
जिल्हा परिषद अध्यक्षपद ठराविक कालावधीसाठी ठरवुन दिल्यानंतर आता तसे होत नसल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान नाराज जिल्हा परिषद सदस्यांना पक्षश्रेष्ठी सबुरीचा सल्ला देत आहेत. बुलडाणा भाजपामध्ये सध्या आ. डॉ. संजय कुटे, आ. चैनसुख संचेती, आ. आकाश फुंडकर व जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांना हा विषय हाताळायचा आहे. येत्या सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत नेते काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com