कार्यालयाच्या चकरा मारत कागदपत्र जमविले, पण मिळाले नाही घरकुल; आम्ही राहायचं कुठं?

poor people not get gharkul through ramai gharkul scheme in sawali of chandrapur
poor people not get gharkul through ramai gharkul scheme in sawali of chandrapur

सावली ( जि. चंद्रपूर ) :  आर्थिक परिस्थिती कुमकुवत असलेल्या प्रत्येक परिवाराला घर उपलब्ध व्हावे, यासाठी रमाई आवास, शबरी आवास, पंतप्रधान आवास योजना घरकुलासाठी राबविल्या जातात. योजनेचे निकष लक्षात घेऊन कागदपत्र तपासून लाभार्थ्यांची यादी, ठराव पाठविण्याचे काम ग्रामपंचायतीचे आहे. मात्र, पाथरी ग्रामपंचायतीने 2019-20 या सत्रातील ठरावच पंचायत समितीकडे पाठविले नाही. परिणामी पाथरीतील 62 लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. 

पाथरी येथील गरीब लाभार्थ्यांनी घरकुलाची मागणी पाथरी ग्रामपंचायतीकडे केली. ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांन कागदपत्र मागविले. त्यानंतर ठराव घेऊन ते पंचायत समितीकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, ग्रामविकास अधिकाऱ्याने ठराव घेतला नाही. ठराव घेऊन ते पंचायत समितीकडे पाठविले नाही. त्याचा परिणाम 2019-20 या सत्रातील लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. आता ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पाथरीच्या प्रशासकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. प्रशासक नियमित येत नसल्याने ग्रामसेवकाची जबाबदारी आहे. मात्र, ग्रामसेवकही गैरहजर राहत असल्याचे चित्र आहे. 

पाथरी येथील  ग्रामसेवक मानकर यांना वारंवार प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यांनी प्रस्ताव न पाठविल्यामुळे  2019-20 या वर्षात रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. प्रस्ताव मागून पुढीलवर्षी 2020-21 या वर्षात त्यांना लाभ घेता येईल.
-प्रदीप आत्राम,  स्थापत्य अभियंता घरकुल योजना पंचायत समिती सावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com