'झाडे लावा, झाडे जगवा'साठी सावित्रीच्या लेकीचा असाही पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

संग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील दुर्गादैत्य येथील मुलीने सासरी जाताना आई वडिलांना लेकीचे झाड देऊन उपस्थित वऱ्हाळी मंडळींना झाडे लावण्याचा संदेश दिला. हा उपक्रम गावासाठी व सदर वधूचे आई वडील याना कायमची आठवण देणारा म्हणता येईल.

दिवसेंदिवस वाढते तापमान आणि खालावत जाणारी पाण्याची पातळी व वाढते प्रदूषण ग्रामीण भागातील नागरिकांचे जगणे कठीण करीत आहे. यामध्ये वर्षाकाठी झपाट्याने झाडाची होणारी कटाई कारणीभूत ठरत आहे.

गावातील प्रत्येक नागरिकांनी झाडे लावून जगवल्यास वातावरणातील प्रदूषण कमी करून शुद्ध हवा निर्माण करता येईल. यासाठी जागृतीचे माध्यम म्हणून दुर्गादैत्य येथील लेकीने पुढाकार घेऊन 25 मे रोजी स्वतः च्या लग्नात सासरी जाताना आपली आठवण म्हणून आई वडिलांना झाडं देऊन त्याचे संवर्धन करण्याचा आग्रह केला.

दुर्गादैत्य येथील गजानन पांडव याची शारदा नामक मुलीचा विवाह अकोला जिल्यातील गोत्रा येथील दीपक अहिर सोबत 25 मे रोजी संपन्न झाला. सासरी जाताना वधू शारदाने उपस्थित वऱ्हाळी मंडळींना झाडे लावण्याचा संदेश दिला. लग्न समारंभ जागृतीचे माध्यम बनू शकते हेही याद्वारे दाखवून दिले. पर्यावरणप्रेमींकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Web Title: Positive story of saving the environment in Sangrampur