शेतकऱ्यांनो लक्ष द्या! कपाशी बियाणे विक्रीला या तारखेपर्यंत स्थगिती; कृषी विभागाचा निर्णय

कृष्णा फंदाट
Wednesday, 6 May 2020

गेल्या दोन वर्षापासून कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव काहीप्रमाणात रोखण्यात यश मिळाले. यावर्षी देखील बोंडआळी येऊ होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने मॉन्सूनपूर्व कपाशी पेरली जाऊ नये म्हणून कपाशी बियाणी विक्रीवर 25 मे पर्यंत स्थगिती दिली आहे.

तेल्हारा (जि. अकोला) : गेल्या दोन वर्षापासून कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव काहीप्रमाणात रोखण्यात यश मिळाले. यावर्षी देखील बोंडआळी येऊ होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने मॉन्सूनपूर्व कपाशी पेरली जाऊ नये म्हणून कपाशी बियाणी विक्रीवर 25 मे पर्यंत स्थगिती दिली आहे.

हेही वाचा- अकोल्यात एकाचा मृत्यू, दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह

कृषी विभागाने व्यक्त केला अंदाज
तेल्हारा तालुक्यातील जमीन सर्वच पिकांसाठी पोषक असली तरी, तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीचा पेरा जास्त प्रमाणात करत असतात. यावर्षी देखील कपाशीचा पेरा जास्त प्रमाणात असेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशी शेतकरी जास्त उत्पन्न मिळावे म्हणून मॉन्सूनपूर्व कपाशी पेरत असतात.

पण यामुळे बोंड अळीचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो 19-20 चा हंगामामध्ये पावसाळा लांबल्याने एप्रिल महिन्यापर्यंत शेतात कपाशीचे झाड उभे होते. त्यामुळे बोंड अळी केमित खाद्य पुरवठा होऊन 20-21 च्या हंगामात बोंड अळीची समस्या उद्‍भवू शकते. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने 25 मे पर्यंत कपाशी बियाणी विकू नये अशा प्रकारच्या सूचना सर्वच कृषी सेवा केंद्रांना दिल्या आहेत. जेणेकरून गुलाबी बोंड आळीचा धोका टाळता येईल

क्लिक करा- रात्री उशीरापर्यंत घेतले 80 संशयित नागरिकांच्या घश्‍याचे नमुने

शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व कपाशी पेरू नये
बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन वरिष्ठांकडून कपाशी बियाणे विकू नये अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार दुकानदारांना देखील तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे दुकानदार सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांनी देखील धोका पत्करू नये व मॉन्सूनपूर्व कपाशी पेरू नये.
-मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

बिटी बियाणी विकणार नाही
तालुका कृषी कार्यालयाकडून बीटी बियाणे 25 मे पर्यंत विकू नये, अशा प्रकारच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे आम्ही बिटी बियाणी विकणार नाही.
-देवा वानखडे, तेल्हारा, कृषी केंद्र चालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postponement of sale of cotton seeds till 25 may in akola district