अंबानी, अदानींसाठी वीज दरवाढ!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नागपूर - महावितरणच्या सुमारे ३० हजार कोटींची दरवाढ याचिकेवरच्या सुनावणीत काही मोजक्‍याचा लोकांना प्रवेश दिला जात असल्याने आमदार सुनील केदार आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. घोषणबाजी करून कार्यकर्त्यांनी स्वतःला अटकही करवून घेतली. यावेळी अंबानी, अदानी यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सर्वसामान्यांवर दरवाढ लादली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 

महसुली तूट भरून काढण्यासाठी महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढ याचिका दाखल केली. महावितरणच्या दरवाढ याचिकेवर सध्या राज्यभरात जनसुनावणी घेण्यात येत आहे. नागपूरमध्ये आज वनामतीच्या सभागृहात कडेकोट पोलिस बंदोबस्त सुनावणी घेण्यात आली. प्रत्येकाची चौकशी करूनच त्यांना आत सोडण्यात येत होते. यावर काँग्रेसचे आमदार सुनील केदार व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, तसेच वीजग्राहक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी आक्षेप घेतला. सुनावणीला प्रारंभ होताच कार्यकर्त्यांनी ‘महावितरण मुर्दाबाद’, ‘भाजप सरकार मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्ते धक्काबुक्की करत आत शिरले व गोंधळही घातला. 

सुनावणी रद्द करा 
विरोधात बोलू नये याकरिता कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. सुनावणीत मोजक्‍या लोकांनाच सोडण्यात येत आहे. वीज दरवाढीसारख्या गंभीर मुद्द्यावरच्या सुनावणीत भेदभाव केला जात आहे. त्यामुळे सुनावणी रद्द करावी. 
-सुनील केदार 

आकड्यांची धूळफेक 
प्रत्येकवेळी दरवाढीसाठी वीजहानीचे कारण दिले जाते. महसुली तुटीचे कारण देताना प्रशासकीय खर्च व इतर तांत्रिक मुद्द्यांचा युक्तिवाद करण्यात आला आहे. वीजदरवाढीचे अर्थकारण सर्वसामान्यांना कळत नाहीत. त्यामुळे घोषणाबाजी व रोषाच्या माध्यमातून रोष बघायला मिळतो. केवळ आकड्यांची धूळफेक करून वीज दरवाढ थोपविली जात आहे. -प्रफुल्ल गुडधे

आयोगावर विश्वासच नाही 
आयोगावर महावितरणच्याच निवृत्त अधिकाऱ्यांचा भरणा आहे. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना न्याय मिळण्याची अपेक्षा करता येत नाही. वीजनिर्मितीसाठी येथीलच पाण्याचा वापर केला जातो. प्रदूषणाचा सामना आम्हाला करावा लागतो. कुठलाही ट्रान्समिशन तोटा नसताना महागडी वीज खरेदी करावी लागते. यामुळे येथे उद्योगांना चालना देण्यासाठी स्वस्त वीज द्यावी. 
-अनिल वडपल्लीवार

Web Title: Power rate increase issue in aurangabad