महापालिका 2019 पासून करणार कचऱ्यातून वीजनिर्मिती - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नागपूर - नागपूर शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी 800 मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रियेद्वारे एजन्सीची निवड झालेली आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर 2019 पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात विधान परिषदेत दिली. 

प्रकाश गजभिये यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर शहरातून दररोज 1100 ते 1200 मेट्रिक टन घनकचऱ्याची निर्मिती होते. त्यापैकी सध्या 200 टन मिश्र कचऱ्यांचे विलगीकरण करण्यात येते. त्यातून कम्पोस्ट व आरडीएफची निर्मिती केली जाते. ऑपरेटरद्वारे हे कंपोस्ट राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर कंपनीसह आरडीएफ नागपूर परिसरातील विविध उद्योगांना त्यांचे बॉयलर इंधन म्हणून विकण्यात येते. निव्वळ प्लॅस्टिकवर प्रक्रियेची महानगरपालिकेकडे सध्या व्यवस्था नसली तरीही जमा झालेल्या प्रक्रियेची संपूर्णपणे विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्पाद्वारे प्लॅस्टिक व आरडीएफ वेगळे करून इंधन चंद्रपूर येथील सिमेंट प्रकल्पाला देण्यात येते. त्यासाठी झिग्मा ग्लोबल एनव्हायरल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची निवड केली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Power utility waste from municipal corporation 2019 says CM