नाना पटोलेंच्या मतदारसंघात काँग्रेसला फक्त २ जागा, लाखनीवर राष्ट्रवादीचा झेंडा

NCP Victory on Lakhani Nagarpanchayat
NCP Victory on Lakhani Nagarpanchayatsakal media

लाखनी (जि. भंडारा) : लाखनी नगरपंचायत निवडणुकीसाठी (Lakhani Nagarpanchayat Election) एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना जोरदार धक्का बसला आहे. कारण, त्यांच्या काँग्रेस (Congress) पक्षाला फक्त २ जागा मिळविता आल्या. तर या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने ताबा मिळवला आहे.

NCP Victory on Lakhani Nagarpanchayat
बुलडाणा : बच्चू कडूंची जोरदार एन्ट्री', भाजपच्या माजी मंत्र्यांवर 'प्रहार'

लाखनी नगरपंचायतीवरून यापूर्वी भाजपची सत्ता होती. पण, भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी खूप मेहनत घेतली. त्याचेच फळ त्यांना मिळाले असून १७ जागांपैकी एकूण ८ जागांवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. तसेच भाजपला एकूण ६ जागा मिळवता आल्या. पण, नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघाअतंर्गत येणाऱ्या या लाखनी नगरपंचायत निवडणुकीत मात्र काँग्रेसला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेसचे नाना पटोले यांनी स्वतः याठिकाणी प्रचार केला होता. पण, मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

कोणत्या पक्षाला किती जागा? -

  • राष्ट्रवादी काँग्रेस : 8

  • काँग्रेस : 2

  • भाजप : 6

  • अपक्ष : 1

  • एकूण : 17

लाखनी नगरपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवार -

  • प्रभाग क्र. 1 - विपुल कांबळे (काँग्रेस)

  • प्रभाग क्र. 2 - कांता निर्वाण (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. 3 - राजेश निंबेकर ङ(राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. 4 - विभा अशोक हजारे (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. 5 - महेश आखरे (भाजप)

  • प्रभाग क्र. 6 - सारिका बशेशंकर (भाजप)

  • प्रभाग क्र. 7 - त्रिवेणी पोहरकर (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. 8 - लता रोडे (भाजपा)

  • प्रभाग क्र. 9 - प्रदीप तितीरमारे (कॉंग्रेस)

  • प्रभाग क्र. 10 - प्रेरणा व्यास (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. 11 - निशा मोहरकर (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. 12 - संदीप भांडारकर (भाजप)

  • प्रभाग क्र. 13 - ज्योती निखाडे (अपक्ष)

  • प्रभाग क्र. 14 - अश्विन धरमसारे (भाजप)

  • प्रभाग क्र. 15 - सविता सोनवाने (भाजप)

  • प्रभाग क्र. 16 - अरमान धरमसारे (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. 17 - सचिन भैसारे (राष्ट्रवादी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com