युवकाचा बालाघाट-मुंबई पायी प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

शेंदूरजनाबाजार - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या तरुणाने बालाघाट ते मुंबई अशी आगळीवेगळी पदयात्रा सुरू केली. प्रकाश ठाकरे (वय ३६, रा. किनी बालाघाट) असे त्या तरुणाचे नाव आहे. तो एक नोव्हेंबरपासून मध्य प्रदेशातील बालाघाट येथून पायदळ प्रवासाला निघाला आहे. तो ११०० किमीचा पायदळ प्रवास करून मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीला अभिवादन करणार आहे.

प्रकाश ठाकरे हा ११०० किलोमीटर पायी प्रवास करणार आहे. तो ११ नोहेंबर रोजी तिवसा येथे पोहोचला, त्याने तिवसा येथे काही लोकांशी संवाद साधत पदयात्रा तसेच प्रवास  आणि ध्येयाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान भारतीय समाजासाठी कसे उपयुक्त आहे आणि सर्वांनी संविधानाचे रक्षण करणे कसे आवश्‍यक आहे तसेच समाजात संविधानाबाबत समज-गैरसमज कसे दूर करता येईल, यासाठी आपली पदयात्रा असल्याचे सांगितले.  

देशात भ्रष्टाचार, बलात्कार अन्य समाजविघातक वाढत्या प्रवृत्तीला पायबंद बसावा, सर्व जातीधर्माचे लोक कसे गुण्यागोविंदाने आणि बंधुभावाने राहतील, अर्थात देशात  सर्वधर्मसमभावाचे वातावरण निर्माण होऊन देश एकतेने नांदावा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व बहुजन बांधवाला दिलेला संदेश सर्वांनी स्वीकारून देशात आंबेडकर चळवळ प्रखरपणे युवकांनी सुरू ठेवून जातीवाद नष्ट करावा हाही हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. सहा डिसेंबर रोजी तो मुंबई येथे पायदळ पोहोचणार असून, या प्रवासात ज्या ज्या ठिकाणावरून तो पायदळ जाईल त्या त्या ठिकाणी तो हा संदेश देणार आहे, असे त्यांनी सांगितले. ६ डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचल्यानंतर तो चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पदयात्रेचा समारोप करणार आहे. त्याची पदयात्रा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Web Title: Prakash Thakare Balaghat to mumbai Walking Journey