राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी सेवाग्रामात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

वर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या 50 व्या वर्धापनदिन समारंभात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेवाग्रामला येण्याची शक्‍यता आहे. या दौऱ्यात ते बापूकुटीला भेट देतील व परिसरात वृक्षारोपण करणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने बंदोबस्त लावला आहे.
राष्ट्रपती कोविंद यांच्या संभाव्य दौऱ्याविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिस प्रशासनाने एक सप्ताहापूर्वीच बापूकुटी, हेलिपॅड मैदान आणि रुग्णालयाच्या नवनिर्मित सभागृहाच्या परिसरात पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. मात्र, या दौऱ्याविषयी प्रशासकीय स्तरावरून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाला 17 ऑगस्ट 2019 ला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शनिवारी (ता. 17) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल श्रीविद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. अद्याप अधिकृत माहिती देण्यात न आल्यामुळे आणखी कोणकोणते मंत्री सोबत येणार आहेत, याविषयी कळू शकले नाही. सेवाग्रामला येणारे रामनाथ कोविंद हे सहावे राष्ट्रपती असतील. यापूर्वी देशाचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी दोन मार्च 1974 ला आले होते. सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी 16 एप्रिल 1978 ला आले होते. आठवे राष्ट्रपती आर. व्ही. व्यंकटरमण 23 फेब्रुवारी 1988 ला, 11 वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम 15 जून 2007 ला सेवाग्राम आश्रमात आले होते. 13 वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 26 नोव्हेंबर 2014 ला सेवाग्राम आश्रमाला भेट दिली होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कस्तुरबा रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त 17 ऑगस्टला सेवाग्रामात येत आहेत. या दौऱ्यात ते सेवाग्राम आश्रमाला भेट देतील. बापूकुटीचे दर्शन घेऊन परिसरात वृक्षारोपण करतील. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर तीन दिवसांपासून आश्रम परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Ram Nath Kovind at the sevagram ashram on Saturday