पंतप्रधानाच्या मार्गात बदल!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नागपूर - शहरात ठिकठिकणी सिमेंट रस्ते तयार करण्यात येत आहेत. शहरातील रस्त्यांचे बांधकाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात अडथळा ठरत असल्याने आता त्यांच्या नियमित मार्गातच बदल केल्याची माहिती आहे.

नागपूर - शहरात ठिकठिकणी सिमेंट रस्ते तयार करण्यात येत आहेत. शहरातील रस्त्यांचे बांधकाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात अडथळा ठरत असल्याने आता त्यांच्या नियमित मार्गातच बदल केल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ते दिल्लीहून नागपूर विमानतळावर येतील. येथून आरपीटीएसमार्गे पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचे दर्शन घेतील. पूर्वी आयटीआयमार्गे ते दीक्षाभूमी या मार्गाने ते येणार होते. पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीच्या अधिकाऱ्यांनी मार्गाची पाहणी केली. या मार्गावर सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या ताफ्यात अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली. त्यामुळेच मार्गात बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. आता नवीन मार्गही निश्‍चत केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. दीक्षाभूमीवरून ते कोराडी वीज प्रकल्पाच्या नवीन तीन संचाचा शुभारंभ करतील. त्यानंतर ते दोन वाजताच्या सुमारास कोराडी मार्गावरील क्रीडासंकुल येथील डीजीधन कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थित राहणार आहेत.

बचतगटाचे स्टॉल
क्रीडासंकुल येथे विविध बॅंक आणि कंपन्यांचे 80 स्टॉल राहणार आहेत. यात काही स्टॉल बचतगटांचेही आहेत. कॅशलेश व्यवहाराच्या माध्यमातून या बचतगटांच्या मालाची विक्री होणार आहे.

अग्निशमन विभागाच्या सात गाड्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी अग्निशमन विभागाच्या सात गाड्या लावण्यात येणार आहेत. यातील गाडी यांच्या पथकासोबत असून, प्रत्येक ठिकाणी दोन-दोन गाड्या ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी तीनही ठिकाणच्या व्यवस्थेबाबतचा आढावा घेतला. त्यानंतर क्रीडासंकुल येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची व व्यवस्थेची पाहणी केली. आवश्‍यक सर्व सुविधा वेळत उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या.

Web Title: prime minister route change