"एक्‍स्पो'तून पंतप्रधानांच्या स्वप्नांना बळ

सिव्हिल लाइन्स ः पंतप्रधान आवास योजना एक्‍स्पोचे उद्‌घाटन करताना महापौर नंदा जिचकार; शेजारी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नगरसेवक सुनील अग्रवाल व क्रेडाईचे पदाधिकारी.
सिव्हिल लाइन्स ः पंतप्रधान आवास योजना एक्‍स्पोचे उद्‌घाटन करताना महापौर नंदा जिचकार; शेजारी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नगरसेवक सुनील अग्रवाल व क्रेडाईचे पदाधिकारी.

नागपूर : देशातील प्रत्येक व्यक्तीला सन 2022 पर्यंत हक्काचे घर देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले. त्या दिशेने यंत्रणा कार्य करीत आहे. नागपूर महापालिका व क्रेडाईच्या वतीने आयोजित केलेल्या प्रॉपर्टी एक्‍स्पोच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या स्वप्नांना बळ मिळेल, असा विश्‍वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात प्रधानमंत्री आवास योजना प्रॉपर्टी एक्‍स्पोचे शुक्रवारी महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती अभय गोटेकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, लखन येरावार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेश रहाटे, क्रेडाईचे अध्यक्ष अनिल नायर, सचिव गौरव अगरवाल उपस्थित होते.
अनेक शासकीय जागांवर अतिक्रमण झालेले आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे थांबणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या प्रॉपर्टी एक्‍स्पोच्या आयोजनामुळे प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा होणार आहे. एक्‍स्पोमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंदणीही होईल, असेही महापौर म्हणाल्या. सर्वांसाठी घरे निर्माण करणे हे सरकारला शक्‍य नव्हते. म्हणूनच त्यांनी क्रेडाईसारख्या संस्थेला मदतीला घेऊन शासकीय दरात सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य हाती घेतले, असे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा म्हणाले. प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी केले. संचालन धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. 27 जानेवारीपर्यंत आयोजित एक्‍स्पोमध्ये 20 बिल्डर व अर्थसहाय करणाऱ्या संस्थांचे स्टॉल लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com