मातृभाषांतून लिहिण्यास प्राधान्य द्यावे - सुधाकर गायधनी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नागपूर - केवळ आदिवासीच नव्हे तर इतर समाजातील नव्या लेखकांना आपल्या ग्रंथ प्रकाशनासाठी एक हक्काची प्रकाशन संस्था असावी, म्हणून उलगुलानसूर्य प्रकाशनाला सुरुवात करण्यात आली. प्रमाण भाषा म्हणून मराठी भाषेतून साहित्यनिर्मिती न करता गोंडी, कोलामी, माडिया, कोरकू या मातृभाषांमधूनही आदिवासींनी भरभरून लिहावे, असे मत कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले. 

माकडे ले-आउट येथे घेण्यात आलेल्या उलगुलानसूर्य प्रकाशन व सर्वदमन बुक सेंटर या दोन साहित्य संस्थांच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. 

अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या हिंदी भाषाप्रमुख डॉ. वीणा दाढे होत्या. त्यासोबतच डॉ. ईश्‍वर नंदपुरे, डॉ. संजय राऊत, प्रा. वसंतराव कन्नाके, दामोदर नेवारे, सुनील कुमरे, प्रा. डॉ. विनायक तुमराम उपस्थित होते. संचालन पितेश्‍वर येरमे यांनी केले. आभार प्रा. विनोद मेश्राम यांनी मानले.

Web Title: priority for mother tongue writing