खासगी बस उभ्या ट्रकवर धडकली

नागपूर  :  अपघातानंतर चक्काचूर झालेली खासगी बस.
नागपूर : अपघातानंतर चक्काचूर झालेली खासगी बस.

उमरेड (नागपूर ) : ब्रह्मपुरी येथून प्रवाशांना घेऊन निघालेल्या खासगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशी ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास झाला. या घटनेत 25 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.
एमएच-49/ए टी - 6754 क्रमांकाची खासगी बस ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे भरधाव येत होती. शेवटची बस असल्याने प्रवाशांची संख्याही जास्त होती. पाचगाव शिवारातील कुही फाट्याजवळ रस्त्यावर एमएच-31/सी बी - 7656 ट्रक उभा होता. वेगात येणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकवर आदळली. आघात एवढा जोरात होता की, बसचा समोरील भाग चक्काचूर झाला. या घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 25 जखमी झाले. मृतांमध्ये चालक कार्तिक ईश्‍वर गोंगला (वय 35, रा. उमरेड), शंकर कटूजी केवट (वय 45, रा. नरसाळा), प्रमिला शंकर केवट (वय 41, रा. नरसाळा) व सोनू ठाकरे (वय 31) यांचा समावेश आहे. यातील काही गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. सर्व जखमींना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com