आता खासगी स्रोतांच्या पाण्याचीही तपासणी

श्रीकांत पेशट्टीवार - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

चंद्रपूर - आपल्या घरचे पाणी तपासायचे असेल, तर आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही. भूजल सर्वेक्षण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या प्रयोगशाळांत आता खासगी विहिरी, हातपंप यासारख्या स्रोतांच्या पाण्यातील 22 घटकांचे रासायनिक आणि जैविक नमुने तपासण्याची सुविधा नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अनुषंगाने शासनस्तरावर एक राज्य प्रयोगशाळा, 24 जिल्हा प्रयोगशाळा आणि दहा उपविभागीय प्रयोगशाळा प्रस्तावित आहेत. यापूर्वी केवळ शासकीय नळ पाणीपुरवठा योजना, हातपंप आणि विहिरीतील पाणी नमुन्यांची तपासणी केली जात होती. 

शहरी आणि ग्रामीण भागाच्या पाण्यातील काही भागांत क्षार आणि काही भागांत फ्लोराइडसारखे घटक असतात. फ्लोराइडमुळे नागरिकांना हाडाचे विकार होतात. लहान मुलांची वाढ, गरोदर महिलांनाही फ्लोराइडयुक्त पाण्यामुळे हाडांचे आजार होतात. वयोवृद्धांना उठता-बसता येत नाही. लहान मुलांचे दात लाल होणे, ठिसूळ होण्याचेही प्रमाण वाढू लागले आहेत. आता अनेक भागांत नायट्रेटचे प्रमाणही वाढू लागले आहे. अशा भागांत दुसरा कोणताही पर्याय नसल्याने शासनाने पाणी देणारे "एटीएम‘ लावले आहेत. त्यातून शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहे. नागरिकांना स्वच्छ व निर्जंतुक पाणी देण्यासाठी खासगी पाणी नमुने तपासणी करण्याची सुविधा शासनाने भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. नाममात्र शुल्क आकारून पाण्यातील जैविक व रासायनिक असे 22 घटक तपासणी करून मिळणार आहेत.
 
सध्या राज्यात भूजल सर्वेक्षण विभागांतर्गत 6 विभागीय प्रयोगशाळा आहेत. चार जिल्हास्तरावर, तर 135 उपविभागीय प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांतून आजवर शासकीय योजनांचे पाणी नमुने तपासले जात होते. ग्रामीण भागात स्रोतांचे पाणी नमुने जलरक्षक जमा करून ते जवळच्या उपविभागीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेऊन देतात. तिथे असलेले प्रयोगशाळा कर्मचारी पाणी नमुने तपासणी करून त्याचा अहवाल पंचायत समिती, आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील पाणी गुणवत्ता तज्ज्ञांकडे पाठविला जात होता. अहवालाच्या आधारे वेळीच कारवाई केली जात होती. 

Web Title: Private sources of water, now check