नाट्यगृहातच घडतात कलावंत - प्रियांका ठाकूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नागपूर - खरा कलावंत नाटकाच्या थिएटरमध्येच घडतो. अभिनय क्षेत्रात "शॉर्टकट' शोधणाऱ्या कलावंतांना नाट्यगृहातील प्राथमिक शिक्षण मिळत नाही, असे मत अभिनेत्री प्रियांका शक्ती ठाकूर यांनी आज "कॉफी विथ सकाळ'मध्ये केलेल्या दिलखुलास चर्चेदरम्यान व्यक्त केले. 

नागपूर - खरा कलावंत नाटकाच्या थिएटरमध्येच घडतो. अभिनय क्षेत्रात "शॉर्टकट' शोधणाऱ्या कलावंतांना नाट्यगृहातील प्राथमिक शिक्षण मिळत नाही, असे मत अभिनेत्री प्रियांका शक्ती ठाकूर यांनी आज "कॉफी विथ सकाळ'मध्ये केलेल्या दिलखुलास चर्चेदरम्यान व्यक्त केले. 

यावेळी अभिनेत्री ठाकूर यांच्यासह स्वाक्षरी संकलनात लिमका बुकमध्ये नोंदणी झालेले दिलीप डहाके उपस्थित होते. ठाकूर यांनी भोपाळमध्ये वयाच्या आठव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. तेथील प्रसिद्ध कलावंत गुरू हबीब तन्वीर यांच्या मार्गदर्शनात अभिनयाचे धडे घेतले. "राजनीती' या हिंदी चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

"एक विवाह ऐसा भी' या चित्रपटात नायकाच्या बहिणीची भूमिका साकारली. आजच्या तरुण पिढीला नाटकातील मेहनत नको असते. त्यामुळे त्यांचे नुकसान होत असल्याची खंत प्रियांकाने व्यक्‍त केली. 

नागपुरातील व्यावसायिक शक्ती ठाकूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर भोपाळ सोडून नागपूरला स्थायिक झाले. येथे आल्यावर लक्षात आले की, येथे मराठी नाट्यसृष्टीला चांगले दिवस असताना, हिंदी नाटकांना फारसे स्थान दिले जात नाही. त्यामुळे हिंदी नाट्यसृष्टीला मोठे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हिंदीतील "रोटी वाली गली' नाट्यप्रयोग महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाला. नाटकाला उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय पारितोषिक मिळाल्यावर आत्मविश्‍वास वाढला आणि हिंदी नाट्यसृष्टीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. अनेक दिग्दर्शक आणि कलावंतांनी सहकार्य केले. हिंदी नाट्यसृष्टीसाठी काम करताना पतीच्या प्रोत्साहनामुळे भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. चित्रपटात राजकीय भूमिका करणे सोपे असले तरी, प्रत्यक्षात राजकारणात कार्य करणे कठीण असते. हिवाळी अधिवेशनादरम्यान 13 डिसेंबर रोजी "झलकारी बाई' नाट्यप्रयोग सादर करणार असून, त्याचे लेखन, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका या सर्व जबाबदाऱ्या स्वतः सांभाळल्याचे प्रियांकाने यावेळी नमूद केले. 

Web Title: Priyanka Thakur coffee with sakal