esakal | भंडाऱ्याचा तरुण झळकणार प्रो-कबड्डीत; आकाशची बोली १७ लाख
sakal

बोलून बातमी शोधा

भंडाऱ्याचा तरुण झळकणार प्रो-कबड्डीत; आकाशची बोली १७ लाख

भंडाऱ्याचा तरुण झळकणार प्रो-कबड्डीत; आकाशची बोली १७ लाख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव २९ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला होता. तीन दिवस चाललेल्या लिलावात तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या राज्यांतील खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील खेळाडू आकाश पिकलमुंडे याची प्रो-कबड्डी लीगमधील बंगाल वॉरिअर या संघात निवड झाली आहे.

आकाश पिकलमुंडे हा राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर चमकला. विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्याचे प्रो-कबड्डी स्पर्धेत निवडीचे स्वप्न साकार झाले. तब्बल १७ लाखांची बोली लावून बंगाल वॉरिअर संघात निवडला गेलेला आकाश पिकलमुंडे हा भंडारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू. विशेष म्हणजे, आजपर्यंत विदर्भातून चारच जणांची निवड या स्पर्धेसाठी झाली. जिल्ह्यातील मोहाडी येथील आकाश नत्थू पिकलमुंडे यांनी आज भंडारा जिल्ह्याचे नाव देशपातळीवर मोठे केले.

हेही वाचा: विदर्भातील चार जिल्हे रेड झोनमध्ये! स्थिती चिंताजनक

आयपीएलप्रमाणे कबड्डीची प्रो-कबड्डी स्पर्धा देशपातळीवर आयोजित केली जात आहे. खेळाडू निवडीसाठी लिलाव प्रक्रिया तीन दिवसांपासून सुरू होती. अखेरच्या दिवशी भंडारा जिल्ह्यासाठी गोड बातमी आली. आकाश पिकलमुंडे यांची बंगाल वॉरिअर्स संघाने १७ लाखांची बोली लावून सहभागी करून घेतले. ‘सी’ वर्गवारीत मोडत असलेल्या आकाशची बेसिक बोली ही १० लाखांची होती. त्यापेक्षा सात लाख रुपये अधिक मिळाले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू

प्रो-कबड्डी स्पर्धेसाठी एखाद्या संघात बोली लागलेला आकाश हा भंडारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे. मोहाडीच्या जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात विद्युत मंडळ क्लबच्या माध्यमातून कबड्डी कौशल्याला विकसित करणाऱ्या आकाशने शालेय ते महाविद्यालयीन गटात राष्ट्रीयस्तरापर्यंत उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले आहे. भारत पेट्रोलियम, मुंबई कबड्डी टीम यांच्याकडून खेळणारा आकाश सध्या एअर इंडियासोबत करारबद्ध आहे.

loading image
go to top