महिला वाहकावरील हल्ल्याचा कामगार सेनेकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

अकोला - मध्यवर्ती बसस्थानकावर अमरावती आगारातील महिला वाहकावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात एसटी कामगार सेनेच्या वतीने चंद्रशेखर चऱ्हाटे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. या घटनेमुळे चालक -वाहकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महामंडळाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. 

अमरावती ते दाभेरी जाणाऱ्या एसटीबसच्या महिला वाहकाची नांदगाव पेठ येथून बसमध्ये चढलेल्या एका महिला शिक्षिकेसोबत शाब्दीक वाद झाला व शिक्षिका बसमधून खाली उतरली. आईसोबत वाद घालणाऱ्या महिला बस वाहकावर या २७ वर्षीय युवकाने यावली (शहीद) गावात चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. मंगळवार (ता.२०) घडलेल्या या अमानवी कृत्याचा एसटी कामगार सेनेच्या वतीने गुरुवार (ता.२२) अकोला मध्यवर्ता आगारात जाहीर निषेध केला. 

हल्लेखोरास कठोर शिक्षा व्हावी 
या गंभीर घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कामगार सेनेने निषेध व्यक्त केला. महिला वाहकांसोबत प्रवाशांनी अशा प्रकारे वर्तणूक करू नये, म्हणून या हल्लेखोराला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रशेखर चऱ्हाटे, चंद्रशेखर राठोड, महेद्र राजपूत, प्रशांत सप्रे, विनय बोदडे, आर. व्ही. गोगे, एस. टी. जुमडे, दिपक पवार, उज्वला मोहोड, रिना चावरे, ज्योती गवळी, इंदीरा मुकुंद आदींनी केली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Prohibition of Invasion on female carrier in akola