दूध उत्पादकांना दिलासा देणारा हा प्रकल्प अखेर झाला सुरू

भंडारा : दूध भुकटी प्रकल्पाचे उद्‌घाटन करताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व उपस्थित इतर.
भंडारा : दूध भुकटी प्रकल्पाचे उद्‌घाटन करताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व उपस्थित इतर.

भंडारा : दूध उत्पादक जिल्ह्यातील दूध संघाचा भुकटी प्रकल्प बंद पडला होता. परिणामी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दुधाची उचल होत नसल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत होते. याबाबत तातडीने निर्णय घेऊन शनिवारी (ता. 4) विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकरी शेती व्यवसायासोबतच पशुपालनातून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. जिल्ह्यात दुधावर आधारित प्रकल्प बंद असल्याने दुधाची खप कमी झाली. त्यामुळे दूध संघ तोट्यात आला. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

यांनी घेतला निर्णय

पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी या प्रकल्पाला भेट दिली. बंद असलेला दूध भुकटी प्रकल्प दोन दिवसांत सुरू करण्याचे निर्देश दिले. शनिवारी नाना पटोले यांच्या हस्ते प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली.

70 हजार लिटर दुधाचे रूपांतर

जिल्ह्यातीलच नव्हेतर विदर्भातील दूध या प्रकल्पात येणार आहे. 70 हजार लिटर दुधाचे रूपांतर भुकटीत होणार आहे. या प्रकल्पामुळे दूध संघाला मजबुती मिळेल. शेतकऱ्यांचे दूध वाया जाणार नाही. यावेळी आमदार राजू कारेमोरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, दूध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक विनायक बुरडे, जयंत वैरागडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com