दबंग सुनील केदार, वडेट्टीवारांचे प्रमोशन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

नागपूर : जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार आणि चंद्रपूर लोकसभा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसने प्रमोशन दिले आहे. वडेट्टीवारांना गटनेते करण्यात आले असून केदार यांना पक्षाचा प्रतोद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची दबंग अशी ओळख आहे.

कॉंग्रेस फुटणार, बारा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटील करीत होते. मात्र अद्याप त्यांच्या गळाला एकही आमदार लागलेला नाही. त्यांच्या दाव्यामुळे अनेक आमदारांकडे संशयाच्या नजरेने बघितल्या जात होते. त्यात केदार यांचाही समावेश होता. लोकसभेच्या उमेदवारी वाटपाच्यावेळी केदार यांनी थेट कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्याशी पंगा घेतला होता. त्यांनी अनुसूचित जाती जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. जिल्हा कॉंग्रेसच्या बैठकीतही त्यांचेच नाव समोर केले होते. त्यामुळे त्यांचे कॉंग्रेसच्या नेत्यांशी खटके उडाले होते. याचा वचपा विधानसभेत तिकीट कापून घेतल्या जाईल असा राजकीय तर्क लावल्या जात होता. त्यामुळे केदार कॉंग्रेस सोडतील या चर्चेला उधाण आले होते.
विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना ऐनवेळी कॉंग्रेसमध्ये आणले होते. त्यांना सहजपणे लोकसभेची उमेदवारी मिळेल असे वाटत असताना दुसरेच नाव घोषित केल्याने कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. वडेट्टीवार यांनी आपले वजन पणाला लावून शेवटी धानोरकर यांना उमेदवारी मिळवून दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे जिंकून आलेले धानोरकर एकमेव उमेदवार आहेत. त्यांनी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांना पराभूत केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Promotion of Sunil Kedar, Vedettywar