प्रचाराचा "भोपू' बंद 

file photo
file photo

अमरावती : पक्षांचे झेंडे, टोप्या घालून डिजेच्या तालावर थिरकत दुचाकी फेरीमध्ये सहभागी झालेले उत्साही कार्यकर्ते, उमेदवारांचा जयघोष, फेरीत सहभागी झाल्यानंतर फेसबुक लाइव्ह तसेच सेल्फी काढणारे कार्यकर्ते असे चित्र शनिवारी (ता.19) शहरात सर्वत्र दिसून आले. विधानसभा निवडणुकीचा "भोपू' बंद होण्यापूर्वी विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी दुचाकी फेरी, पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. 
विशेष म्हणजे प्रचाराच्या काळात वाजणारे भोंगे, पदयात्रांमुळे होणारी वाहतूक कोंडी, उमेदवारांच्या सभा, चकरा यापासून मतदारांची मात्र सुटका झाली आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी (ता.21) होणार असून शनिवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. मात्र तत्पूर्वी उमेदवारांनी दिवसभराचा वेळ शक्‍तिप्रदर्शनासाठी नियोजित करून ठेवला होता. शनिवारी सकाळपासूनच अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून दुचाकी फेऱ्या काढण्यात आल्या. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मतदारासंघातसुद्धा उमेदवारांनी जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले. वाहनांवर पक्षांचे झेंडे व बोधचिन्ह लावून कार्यकर्ते दुचाकी फेरीमध्ये सहभागी झाले होते. मतदारसंघांचा व्याप फार मोठा असल्याने सकाळी 8 वाजतापासूनच अनेक उमेदवार घराबाहेर पडले. पावसाळी वातावरण असल्याने उमेदवारांनी सुटकेचा निःस्वास टाकला. मात्र प्रचार फेरीत सहभागी प्रत्येक उमेदवारांच्या चेहऱ्यावरील चिंताभाव मतदारांपासून लपविता आला नाही. 

कुणाची फेरी मोठी ?
निवडणुकीतील विविध उमेदवारांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून प्रचार फेऱ्यांच्या व्हिडिओ क्‍लिप्स टाकल्या होत्या. कोणत्या उमेदवाराची रॅली सर्वात मोठी याचीच चर्चा दिवसभर शहरात रंगली होती. मात्र दुसरीकडे अनेक कार्यकर्त्यांनी दोन्ही उमेदवारांकडून पेट्रोल टाकून घेत रॅलीचा आनंद लुटला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com