सरकारच्या धोरणाविरोधात निषेध मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कामठी (जि.नागपूर) : "एक राष्ट्र एक संविधान' ही बाब भारत देशामध्ये लागू आहे, पण सरकारचे धोरणामुळे सर्वसामान्यांचे बेहाल होत असून आर्थिक अडचणीत अडकले आहेत. ज्या प्रमाणे दिल्ली राज्यात विजेचे दर आहेत त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही लागून व्हावेत यासह विदर्भ राज्याची मागणी करीत राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलवर धडक दिली.

राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राष्ट्रीयअध्यक्ष राजेश काकडे तसेच तेजस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुल्लेवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला. ज्या प्रमाणे दिल्लीतील केजरीवाल सरकार नागरिकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देत आहे, तर 400 युनिटपर्यंत सबसिडी दिली जात आहे. हाच नियम महाराष्ट्रात लागू करावा. वीजबिलाची थकबाकी असलेल्यांचे संपूर्ण बिल माफ करावे. शेतकऱ्यांना मोटरपंप व वीजजोडणीसह वीजपुरवठा मोफत द्यावा. वीज केंद्रात स्थानिकांना नोकरी द्यावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. आत्महत्याग्रस्त कुटुंबायास नोकरी द्या, जिल्हा परिषद सर्कलमध्ये कृषी आधारित प्रक्रीया संस्था निर्माण करा, विदर्भातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा, 55 वर्षावरील शेतकऱ्यांना पेंशनसह रेल्वे व बस सेवा निशुल्क प्रवास पासेस द्या, शहरातील  युवकांसाठी एमपीएससी, यूपीएससीची वाचनालये निर्माण करा, तसेच खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्या, व पोलिस भरती व सैन्यभरतीसाठी प्रशिक्षण संस्था निर्माण करा अशा विविध मागण्यांची घोषणाबाजी करीत तहसीलदारांमार्फत सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest march against government policy