Maharashtra vidhansabha 2019 : निवडणुकीत कर्मचाऱ्यांना चांगली सुविधा द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या कामात कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याच्या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा उपनिवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांना दिले.

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या कामात कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याच्या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा उपनिवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांना दिले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सुटी जाहीर करावी, सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे फर्निचर, पंखे, लाइट, पाणी, चहा, नाश्‍ता, भोजन व रात्री आराम करण्यासाठी गाद्यांची व्यवस्था करावी, मतदान संपताच परत जाण्यासाठी बसची व्यवस्था करावी, मानधन निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या दराने सर्व विधानसभा क्षेत्रात सारखेच द्यावे, अपंग व आजारी कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश रद्द करावे, शक्‍यतो कर्मचारी ज्या विधानसभा क्षेत्रात कार्यरत आहे, त्याच विधानसभा क्षेत्रात (मुख्यालय वगळून) नियुक्ती द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत नियोजनाच्या अभावामुळे झालेली अव्यवस्था व त्रासाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide good facilities to employees in elections