अखेर विरुर वनक्षेत्रात पीआरटी पथकाची स्थापन, वाघ-मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाचा पुढाकार

PRT squad established in virur forest department of chandrapur
PRT squad established in virur forest department of chandrapur

राजुरा (जि. चंद्रपूर):  गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाघाचे हल्ले सुरू आहेत. अनेक गावातील नागरिक वाघाच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे वनविभागाने शेतकरी, नागरिकांना दिलासा देण्यासोबतच नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी पीआरटी पथक आणि वनपरिक्षेत्रात प्राथमिक प्रतिसाद पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 

70 वनकर्मचाऱ्यांचा सहभाग असलेले सात पथक असून, वाघ प्रभावित गावातील काही स्थानिक तरुणांना या पथकात रोजंदारीवर सहभागी करून घेण्यात आले आहे. हे पथक दररोज ठरवून दिल्याप्रमाणे प्रत्येक गाव शिवारात, जंगलातील नाले, संवेदनशील क्षेत्रात गस्त घालणे, प्रभावित 15 गावात पथकाद्वारे पथनाट्य, पोस्टर, बॅनर लावून जनजागृती करणे, लाऊड स्पीकरद्वारे सावधानतेचा इशारा देत जंगलात जाण्यास मनाई करणे, दैनंदिन वाघाचे लोकेशन घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पाठविणे ही कामे सातत्याने सुरू आहे. 

उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनात वन क्षेत्रपाल गजानन इंगळे, वनपाल, वनरक्षक, वनमजूर कार्य करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून वाघाला जेरबंद करण्यासाठी क्षेत्रीय वन कर्मचारी, विशेष पथकातील कर्मचारी, डॉक्‍टर, शूटर सामूहिक गटाने गस्त घालत आहेत. कोरोना समूह संक्रमण असतानाही जीव धोक्‍यात घालून कर्मचारी हे अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत आहेत. वाघाला जेरबंद करून वनाला लागून असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना  दिलासा देण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे उद्दिष्ट ठेवून पीआरटी पथकाची स्थापना वनविभाग कामाला लागले आहे.

उपवन संरक्षक आणि उपविभागीय वनाधिकारी यांनाच कोरोनाची लागण झाली. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असणारे वनकर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. असे असतानाही संपर्कात आलेल्या वन कर्मचाऱ्यांची अद्यापही चाचणी करण्यात आली नाही. दरम्यान, एक वनरक्षकसुद्धा पॉझिटिव्ह निघाला असून वाघ पकडण्याची कामे दबावतंत्रात सुरू आहेत,  अशा चर्चा दबक्‍या आवाजात आहेत. मात्र, हा विषय जनतेसाठी जीवघेणा ठरला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com