"पबजी'मुळे तरुणाला "सायकोसिस' 

"पबजी'मुळे तरुणाला "सायकोसिस' 

उमरेड (जि. नागपूर) - प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे भौतिक विकास होत असताना नव्या पिढीचे आयुष्य कोठे चालले आहे, याचे उदाहरण येथे पाहावयास मिळाले. उमरेड येथील एक आयटीआयमध्ये शिकणारा तरुण "पबजी' गेमच्या विळख्यात सापडून त्याच्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. त्याच्या डोळ्यांना व मेंदूला गंभीर विकार जडला आहे. तज्ज्ञांच्या मते त्याला "सायकोसिस' हा मानसिक आजार जडला आहे. 

उमरेडचा रहिवासी असलेला रितीक विवेक कोलारकर (वय 19, कावरा पेठ, उमरेड) हा तरुण स्व. देवरावजी इटनकर, आयटीआयचा विद्यार्थी आहे. त्याच्यासोबत पाच-सहा मित्रांचा एक समूह आहे. त्यांनाही कित्येक दिवसांपासून "पबजी'चे व्यसन जडले आहे. 

रितीकला दिवसाला पाच ते सहा तास सतत गेम खेळण्याचे व्यसन लागले. त्यामुळे रविवारी त्याचे डोळे जळजळ करू लागले आणि अचानक ते बंद झाले. ते उघडत नसल्यामुळे पालकांनी स्थानिक नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप बाकडे यांच्याकडे उपचारासाठी त्याला दाखल केले. तेव्हा डॉक्‍टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितले. त्याचे सिटी स्कॅन झाल्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रितीकचा चुलत भाऊ मनमोहन याने दिली. 

रितीकचा आजार हा डोळ्यांशी संबंधित नसून तो "न्यूरोलॉगिकल प्रॉब्लम' आहे. "न्यूरोलॉगिकल पॅरेलिसिस'सुद्धा असू शकतो. तेव्हा मी त्यांना न्यूरोलॉगिकल तज्ज्ञांकडे "रेफर' करण्यास सांगितले. 
- डॉ. प्रदीप बाकडे, स्थानिक नेत्ररोगतज्ज्ञ 

रितीकचा आजार हा गेमशी संबंधित नसून त्याला "आयटीआय'ची 30 हजार रुपये फी भरायची होती. त्यावरून थोडे भांडण झाले आणि त्याच्या डोक्‍यावर परिणाम झाला. तो आता लवकर बरा होईल, असे डॉक्‍टर म्हणतात. 
- चंदा कोलारकर, रितीकची आई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com