यश बोरकर हत्याकांडातील आरोपीला फाशी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नागपूर - यश बोरकर या चिमुकल्याचे अपहरण करून खून करणारा संतोष कळवे (20) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली.

संतोषवर दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी यशचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणातील युक्तीवाद सोमवारी पूर्ण झाला होता. आज त्यावर अंतिम सुनावणी झाली. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असल्यामुळे संतोषला फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावी असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विजय कोल्हे यांनी केला होता. 

11 जून 2013 रोजी खापरी परिसरात ही घटना घडली होती. संतोष याची आई आजारी होती. त्याला आईच्या उपचारासाठी आणि आपल्या शिक्षणासाठी पैशाची गरज होती. त्यामुळेच त्याने अपहरणाची योजना आखली. यश पाचवीचा विद्यार्थी होता. तो मित्रांसोबत खेळत असताना वडिलांनी त्याला बघितले होते. पण, सायंकाळ होऊनही यश घरी परतेला नाही. रात्री 10 वाजता यशच्या वडिलांना फोन आला. दोन लाख रुपये दिले नाही तर मुलाला मारण्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली.

वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांचा तपास सुरू झाला. अनेकांनी यशला संतोषसोबत बघितले होते. त्यामुळे पोलिसांनी संतोषची कसून चौकशी केली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यशचे अपहरण केल्यानंतर संतोष त्याला घरी घेऊन गेला. त्याला बळजबरीने दारू पाजली. सायंकाळी संतोष त्याला घेऊन मिहान परिसरात गेला. नाल्यात बुडवून त्याचा खून केला. मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखाली लपवून तो घरी परतला. या प्रकरणी पोलिसांनी संतोषला अटक करून तपासाअंती त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. 

Web Title: public prosecutor demand capital punishment for yash borkar killer