वाहतूकव्यवस्था सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींची बोलवणार बैठक : कदम

3Ramdas_Kadam_9.jpg
3Ramdas_Kadam_9.jpg

नागपूर : पुण्यातील सार्वजनिक व संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींची बैठक लवकरच घेण्याचे आश्‍वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी विधान परिषदेत अनंत गाडगीळ यांच्या लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात दिले. पुण्यातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कृती आराखडा केल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील वायू प्रदूषण वाढल्यामुळे लहान मुलांच्या आजारपणात वाढ झाल्याचा मुद्दा गाडगीळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. ते म्हणाले, ‘‘जागतीक आरोग्य संघटनेच्या अहवालात 850 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 14 शहरांचा समावेश आहे. त्यात प्रथम क्रमांकावर वाराणसी, तर तिसऱया क्रमांकावर पुणे आहे. वाढती वाहने, बांधकामाचा राडारोडा व कचरा, प्लॅस्टीक यांमुळे प्रदूषण वाढत आहे. तरंगते धुलीकण (आरएसपीएम), नायट्रोजन डायऑक्साईड (एनओएक्स) या घटकांत वाढ झाली. वाढत्या वायू प्रदूषण पातळीमुळे श्‍वसनाच्या विकारात वाढ झाली आहे. लहान मुलांतील रुग्ण संख्या वीस टक्क्यांनी वाढली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवली पाहिजे. भाजप आमदारांनी दिलेली बसगाडी पीएमपीएमएलने स्विकारली, पण मी आमदार निधीतून दिलेली गाडी नाकारली. कचरा प्रश्‍न चार वर्षात सोडविता आला नाही. 

कृती आराखडा आमदारांना मिळाला नसल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निदर्शनास आणून दिले. पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी उत्तर देण्यास सुरवात केली, मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे व विरोधकांनी हरकत घेतली व गाडगीळ यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देण्यास सांगितले. त्यानंतर, रामदास कदम यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘कृती आराखड्यात 27 मुद्दे आहेत. अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार रस्ते बनविणे, डिझेलमधील सल्फरचे प्रमाण कमी करणे, सीएनजीचा वापर, जुन्या बसगाड्या वापरातून बाद करणे, इलेक्ट्रीक बसगाड्यांचा वापर असे उपाय योजण्यात येणार आहेत. शहरातील कचऱयाची समस्या जुनी आहे. पुण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.‘‘
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com