'संघात सत्तालोलुपांचा भरणा'

'संघात सत्तालोलुपांचा भरणा'

नागपूर - आयुष्याची पन्नाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात घालवली. परंतु, आज संघात सत्तालोलुपांना पदे मिळाली आहेत. संघ अजूनही जुन्या कर्मकांडाचा आग्रह धरतो, अशी टीका करीत संघाच्या व्यवस्थापनात सुधारणा होण्याच्या दृष्टीने "आरएसएस रिव्हॅल्यूड' पुस्तक लिहिल्याचे संघाचे माजी पदाधिकारी व व्हीएनआयटीचे संस्थापक संचालक डॉ. रामभाऊ तुपकरी यांनी सांगितले. 

धरमपेठ महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात "आरएसएस रिव्हॅल्यूड' या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांच्या हस्ते झाले. पुस्तक लिहिण्यामागील विविध कारणे देतानाच डॉ. तुपकरी यांनी संघाच्या कामकाज पद्धतीवर कडाडून टीका केली. संघाबाबत अनभिज्ञ असलेल्या लोकांना पदे दिली जात असल्याचे नमुद करीत त्यांनी वर्तमानात लोकांना जोडण्यासाठी संघाने स्वतः बदल करणे अपेक्षित असल्याचे डॉ. तुपकरी म्हणाले. 

संघ आजही जुन्या विचाराचा, कर्मकांडाचा आग्रह धरत असल्याने नवीन लोक जुळत नाही. एका विचाराने तयार झाला. त्या विचारातून त्याचा प्रचार व प्रसार झाला. संघ आंतरराष्ट्रीय झाला. परंतु, काळानुरूप बदलला नाही. संघात असताना माझे विचार खपवून घेण्यात कमी पडलो, असेही डॉ. तुपकरी यांनी सांगितले. 

"आरएसएस रिव्हॅल्यूड' या इंग्रजी ग्रंथासारख्या विश्‍लेषनात्मक लिखानांचा संघाने योग्य लाभ घेत स्वत:मध्ये योग्य सुधारणा करायला हवी. रा. स्व. संघ शतकाच्या उंबरठ्याकडे वाटचाल करीत आहे. काळानुरूप संघानेही काही बदल घडवून आणायला हवे. संघातील स्वयंसेवकांमध्ये विशेष स्थरानंतर ऐकूण घेण्याची वृत्ती नाही. त्यावर या पुस्तकातून भाष्य केल्याचे ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com