

Akola Crime News
esakal
पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील गल्ली नंबर पाच मधील ऋतुराज सोसायटीमधील सराफा व्यापारी विजय वैद्य यांच्या अजय नामक ३२ क्रमांकाचा बंगला चोरट्यांनी फोडल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये बंगल्या मधून चोरी करून बाहेर पडणाऱ्या काही मुली दिसतात. याप्रकरणात पुणे पोलिसांनी जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदीपूर येथून ता.२२ नोव्हेंबर रोजी ६ मुलींना तपासासाठी ताब्यात घेतले आहे.