हा गोंधळ बरा नव्हे...!

विवेक मेतकर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

अकोला : लेखिका नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पाठविलेले निमंत्रण त्यांच्या उद्‍घाटकीय भाषणावरून रद्द करण्यात आल्याने राज्यातील साहित्य क्षेत्र ढवळून निघाले आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनात पडद्यामागे घटणाऱ्या एक-एक घटना प्रकाशात येत आहेत. संमेलनाच्या वादावर आता सुरू असलेला हा कथ्याकुट काही नवीन नाही. यापूर्वीही संमलेनाच्या आयोजनाबाबत अनेक वाद झाले आहेत. अशाच पुण्यात 2010 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आठ वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांनी त्यांच्या ‘15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी’ या कादंबरीतून मार्मिक भाष्य केले होते.

अकोला : लेखिका नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पाठविलेले निमंत्रण त्यांच्या उद्‍घाटकीय भाषणावरून रद्द करण्यात आल्याने राज्यातील साहित्य क्षेत्र ढवळून निघाले आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनात पडद्यामागे घटणाऱ्या एक-एक घटना प्रकाशात येत आहेत. संमेलनाच्या वादावर आता सुरू असलेला हा कथ्याकुट काही नवीन नाही. यापूर्वीही संमलेनाच्या आयोजनाबाबत अनेक वाद झाले आहेत. अशाच पुण्यात 2010 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आठ वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांनी त्यांच्या ‘15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी’ या कादंबरीतून मार्मिक भाष्य केले होते. पुढे ही कादंबरी चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांपुढे आली होती.  

सांस्कृतिक गंधर्व संमेलन अत्यंत राजेशाही थाटात पार पडत असताना. रोज बासुंदी-पुरी आणि पंचपक्वान्नांचा फडशा पडत असताे. पंचक्रोशीतील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. संमेलनात या आत्महत्यांवर भरल्यापोटी ढेकरा देत देत कविता गाईल्या जातात. कथाकथन होते. कोट्यवधीची उधळन साहित्यिकांच्या या मौजमेजवर खर्च होत असताना जगाच्या पोशिंद्याचे अश्रू पुसण्यासाठी एक दमडीही कुणाला द्यावीशी वाट नाही, ही खंत आहे. कला, साहित्याशी काहीही संबंध नसणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कमावू व ह्रदयशून्य भूमिकेमुळे हा संगळा गोंधळ सुरू आहे. या गोंधळावर वेळोवेळी साहित्य क्षेत्रातून तिखट प्रक्रिया उमटत आल्या आहेत. संमेलन आटोपली की पुन्हा साहित्यिकांना त्याचा विसर पडतो आणि नव्या संमलेनातून नवा गोंधळ मांडला जातो. साहित्य संमेलनात पडद्या मागे चालणारा हा गोंधळ ‘15 आॅगस्ट भागिले 26 जानेवारी’ या कादंबरितून ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांनी आठ वर्षांपूर्वीच शब्दबद्ध केला होता. 

‘जिस तरफ देखे उधर ही दिख रहे नंगे दलाल, 
क्या तुझे इस दृष्य का होता नही कोई मलाल।।
भूखलेकर जिस दिशा की ओर निकले ये किसान, 
गाव मे रोटी नही है, शहर मे गलती न दाल।।’

या ओळीतून एकूणच सांस्कृतिकविश्व म्हणजे चमकोगिरी, गटबाजी, जातीयता आणि बनेल राजकारण याचा चौफेर संगमच असल्याचे दिसून येते. अशा भव्य दिव्य; पण अवैध पाहुणचारामुळे भारावून कानकोंडे झालेले साहित्यिक मग व्यासपीठावरून समाजाला कोणत्या साधनसूचितेची, सोज्वळ आनंदाची, साधेपणाची दिशा देतील? हा प्रश्न एक शब्दकोडेच बनला आहे. हे कोडे उलगड्याचा प्रयत्न बोरकर यांनी त्यांच्या कादंबरीतून केला होता. आता यवतमाळ येथे नियोजित ९२ व्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्‍घटकाचे निमंत्रणच रद्द केल्याने उफाळून आलेल्या वादाने बोरकर यांच्या कांदबरीची पुन्हा आठवण झाली आहे. 

संमेलनाध्यक्षांचे पायही मातीचेच
संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे यांनी गत चार पाच दिवसात महिला म्हणून नयनतारा सहगल यांची बाजू घेणे गरजेचे हेते. मात्र, पदासाठी लाचारी आणि पुणेरी स्वभावाची झलक दिसत असल्याने मौनं संमती दर्शनम या न्यायाने त्यांचेही पाय मातीचेच असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांनी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purushottam Borkar writes in book about disputes of Marathi Sahitya sammelan