Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

Man Dies After Brutal Assault in Pusad : शहरालगतच्या काकडदाती येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला असून संताप व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता. एक) घडली.
Yavatmal Crime News

Yavatmal Crime News

ESAKAL

Updated on

पुसद, ता. 5 : हात-पाय बांधून नग्न अवस्थेत रस्त्यावर केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरालगतच्या काकडदाती येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला असून संताप व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता. एक) घडली.

सखाराम हुलकाने (वय 40, रा. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी (ता. चार) रात्री त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास काकडदाती येथील कृष्ण मंदिराजवळ काही व्यक्तींनी सखाराम यांना हात-पाय दोरीने बांधून नग्न अवस्थेत रस्त्यावर टाकत बेदम मारहाण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com