Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Waghji Bamble Seriously Injured in Shrirampur Incident : पुसद येथील श्रीरामपूर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कॉन्स्टेबल वाघजी बोंबले यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली.
Pusad Excise Constable Attack

Pusad Excise Constable Attack

esakal

Updated on: 

पुसद : पुसद शहरातील श्रीरामपूर परिसरात दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२) सकाळी घडली. या हल्ल्यात विभागाचे कॉन्स्टेबल वाघजी बोंबले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिर्यादीवरून वसंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी निखिल राठोड याला अटक करण्यात आली आहे. गुणवंतराव देशमुख विद्यालयासमोरील सामकी माता जनरल स्टोअर्स या दुकानातून अवैध दारूविक्री होत असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना होता.

Pusad Excise Constable Attack
Nagpur Aerospace Project : नागपूरच्या एअरोस्पेस भरारीला ‘सी-३९०’चे बळ एम्ब्रार-महिंद्रा समूहाच्या भागीदारीतून फायनल असेंब्ली लाइन उभारणार

याच पार्श्वभूमीवर दुकानमालक निखिल राठोड व कॉन्स्टेबल वाघजी बोंबले यांच्यात वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी सुमारे ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान राठोड यांनी बोंबले यांच्याकडे लिहिण्यासाठी पेन मागितला. पेन देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात राठोड यांनी अचानक बोंबले यांच्या पोटावर व हातावर चाकूने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर तीन, हातावर तीन वार झाल्याची माहिती आहे.

तसेच डाव्या हाताच्या अंगठ्यावर गंभीर दुखापत झाल्याने तो तुटल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर जखमी बोंबले यांना तातडीने पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले.

Pusad Excise Constable Attack
Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

घटनेची माहिती मिळताच वसंतनगर पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक पूजा राठोड यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. हल्ल्याचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपी निखिल राठोड याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com