

Sharad Pawar Assures Farmers of Efforts to Reduce Drought Impact During Visit to Baramati Dryland Region
sakal
मोरगाव/ सुपे : ‘‘बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावांच्या शेतसिंचनासाठी पाणी कसं देता येईल, याची काळजी घेतली. जिरायती भागासाठी पुरंदर उपसा सिंचन व जानाई शिरसाई सिंचन योजना केल्या. अशा काही योजना या भागात केल्या, अशा कुठे झाल्या नाहीत. हे केलं तरी शंभर टक्के बागायत शक्य झालं नाही,’’ अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच,‘काही झाले तरी दुष्काळाचे दुखणे कसे कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी ग्वाही दिली.