विद्यार्थ्यांच्या दोन गटांत राडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

अमरावती : अचलपूर येथील एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याने शुक्रवारी (ता. 11) राडा झाला. दोन्ही गटांतील पाच विद्यार्थी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अमरावती : अचलपूर येथील एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याने शुक्रवारी (ता. 11) राडा झाला. दोन्ही गटांतील पाच विद्यार्थी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
महाविद्यालय परिसरात एक विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी जात असताना, त्याचा दुसऱ्या एका विद्यार्थ्याला गर्दीत धक्का लागला. त्यावरून आधी त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोन्ही गटांतील पंधरा ते वीस विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मागे धाव घेतली. येथे त्याच महाविद्यालयातील चार ते पाच जणांनी एकाला काठीने मारहाण करून जखमी केले. जखमी विद्यार्थी घरी निघून गेला. काही जण जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेले. तक्रार नोंदवू नये म्हणून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या जखमी विद्यार्थ्याचे तक्रारीवरून सरमसपुरा ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. विरुद्ध बाजूने दुसऱ्या विद्यार्थ्याने तक्रार केली. त्यात, मित्रांसोबत वाद सुरू असल्याचे बघून वाद, मिटविण्यासाठी गेला असता, त्याच्यासह अन्य काही मित्रांना चार ते पाच जणांनी मारहाण केली, असे तक्रारीत नमुद केले. परस्परविरुद्ध तक्रारीवरून सरमसपुरा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. काही दिवसांपूर्वी परतवाड्यात घडलेल्या तिहेरी हत्येनंतर उद्भवलेली परिस्थिती पोलिसांनी अथक प्रयत्नाने हाताळल्याने येथे शांतता निर्माण झाली. त्यानंतर अचलपूरच्या मेहराबपुरा येथील विद्यार्थ्यांचे दोनगट समोरासमोर भिडल्याने पुन्हा काही वेळेसाठी पोलिसांसमोर आवाहन उभे ठाकले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Put two groups of students in