डेंगीबाबत मनपाच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः मागील महिन्यात शहरात 618 डेंगीचे संशयित रुग्ण आढळून आले असून, 186 जणांना डेंगीची लागण झाली. बदलत्या वातावरणामुळे डेंगीचा धोका वाढत आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने डेंगी निर्मूलनासाठी जनजागृतीसह घरांची तपासणीही केली जात असल्याचा दावा केला असला तरी दिवसेंदिवस संशयित व रुग्णांचा वाढता आलेख बघता प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शहरात घरोघरी रुग्ण आहेत. यात डेंगीचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर महिन्यात एकूण 1098 डेंगीचे संशयित रुग्ण आढळले. यापैकी 395 रुग्णांना डेंगीची लागण झाल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना स्वच्छ ठेवणे, रांजनातील पाणी, सिमेंटच्या टाकीतील पाणी, इमारतीवरील टाकीतील पाणी, परिसरातील प्लॅस्टिकच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी टायर्स वा इतर कोणत्याही स्वरूपात आठ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साठवू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांना आवाहन केले की जबाबदारी संपली, अशा थाटात महापालिकेचे सुरू असल्याचे चित्र आहे. घरांचीही तपासणीही एकप्रकारे फार्स दिसून येत आहे. जनजागृती मोहिमेतून स्टिकर, पोस्टर, एफ. एम. रेडिओद्वारे नागरिकांना माहिती दिली जात असल्याचा दावा मनपाने केला. मात्र, शहरात डेंगीबाबत कुठेही मोठे बॅनर किंवा जनजागृतीचे प्रयत्न दिसून येत नाही. प्रत्येक झोनमध्य मनपाचे हिवताप व हत्तीरोग निरीक्षक, वरिष्ठ क्षेत्र कर्मचारी, हिवताप कर्मचारी, क्षेत्र कर्मचाऱ्यांमार्फत कार्य सुरू असून जनतेला आवश्‍यक माहिती सांगितली जात असल्याचेही मनपाने नमूद केले. मात्र, सप्टेंबर व ऑक्‍टोबर या दोन महिन्यांत संशयित रुग्ण व लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे 89 हजार 412 घरे तपासण्यात आल्याचा दावा केला. त्यापैकी 3900 घरांमध्ये डासअळ्या आढळून आल्या. जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्यांमध्ये एकूण 1098 डेंगी संशयित रुग्ण आढळले. ऑक्‍टोबर महिन्यात सर्वाधिक 618 संशयित रुग्णांची नोंद आहे. त्या खालोखाल सप्टेंबरमध्ये 324 संशयित रुग्ण आढळले असून एकाचा याच महिन्यात मृत्यू झाला. शहरातील 1098 संशयितांपैकी 395 रुग्णांना डेंगी असल्याचे स्पष्ट झाले.

व्हॉट्‌सऍप, ई-मेलवर तक्रारीची सुविधा
खासगी रुग्णालये, दवाखाने तसेच नागरिकांच्या डेंगीसंदर्भात काही तक्रारी असल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदविता येणार आहेत. डेंगीबाबत तक्रार अथवा माहिती हवी असल्यास मनपाच्या 9607942809 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर किंवा vbdcomplaints.nmc@gmail.com या ई-मेलवर किंवा https://m.facebook.com/nmcngp/ या फेसबुक पेजवर आणि https://twitter.com/ngpnmc या ट्विटर पेजवर नोंदविता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com