जिल्हा परिषदेच्या 'कॅफो' पदासाठी सुरु आहे संगीतखुर्ची..  प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान रुजू

सुदीर भारती 
Wednesday, 19 August 2020

जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या अशा शिक्षण विभागाचा कार्यभार प्रिया देशमुख यांच्याकडे होता. शासनाने बुलडाणा येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांची शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी मंगळवारी (ता.18) आपला पदभार सांभाळला.

अमरावती :  जिल्ह्याचे "मिनीमंत्रालय' असलेल्या जिल्हा परिषदेत महत्त्वाच्या विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. आतापर्यंत प्रभारी अधिकाऱ्यांवर जबाबदारी असलेल्या शिक्षण विभागाला स्थायी शिक्षणाधिकारी मिळाले असून महत्त्वाच्या मुख्य लेखाधिकारी (कॅफो) पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सध्या दत्तात्रेय फिसके यांच्याकडे प्रभार आहे.

क्लिक करा - काय म्हणता? चक्क महापौर संदीप जोशी चौकात मारणार दंड-बैठका

जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या अशा शिक्षण विभागाचा कार्यभार प्रिया देशमुख यांच्याकडे होता. शासनाने बुलडाणा येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांची शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी मंगळवारी (ता.18) आपला पदभार सांभाळला. दुसरीकडे मुख्य वित्तलेखाधिकारी पदासाठी अधिकाऱ्यांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली आहे. 

अनेकांनी आपल्या राजकीय पाठबळाचा वापर करून या पदावर वर्णी लागण्यासाठी प्रयत्न सुुरू केले आहेत. सर्व विभागांमध्ये लेखा विभागाचे वरचे स्थान आहे. लाखो रुपयांची देयके तसेच अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणी याच विभागामार्फत होत असल्याने या विभागाच्या अधिकारीपदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तत्कालीन वित्त व लेखाधिकारी रवींद्र येवले यांच्या निवृत्तीनंतर दत्तात्रेय फिसके यांच्याकडे प्रभारी लेखाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. जवळपास एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटूनसुद्धा शासनाकडून अद्यापही स्थायी कॅफोची नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान मंगळवारी नवे शिक्षणाधिकारी एजाज खान रुजू झाले.

अधिक माहितीसाठी -  ‘तू प्रेमविवाह केला ना, मग पतीला का सोडले?' वडिलांनी हा प्रश्न विचारताच मुलगी चिडली अन्...

डायटच्या प्राचार्यपदी प्रशांत डवरे

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणून प्रशांत डवरे यांनी आज पदभार स्वीकारला. प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांचे स्थानांतर नांदेड येथे झाल्याने त्यांच्या जागेवर प्रशांत डवरे यांनी प्रभार स्वीकारला आहे. ज्येष्ठ अधिव्याख्याता असलेले प्रशांत डवरे यांच्याकडे विद्यानिकेतन विद्यालयाच्या प्राचार्य पदाचा प्रभार असून आता नव्याने डायट प्राचार्यांचा अतिरिक्त प्रभार दिलेला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Race for the position of Cafo in amravati ZP